छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन अर्थात ‘एमकेसीएल’ ने रोजगारक्षम युवा पिढी निर्माण व्हावी, यासाठी व्यावसायिक आणि रोजगारक्ष कौशल्य विकसित करणारे नवनवीन कोर्सेस आणि एमएस-सीआयटी कोर्स आता नव्या रुपात उपलब्ध करून दिला आहे. ही माहिती ‘एमकेसीएल’च्या व्यवस्थापकीय संचालिका वीणा कामथ यांनी बुधवारी (ता.१३) पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
महत्त्वाचे म्हणजे मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोफत चार कोर्सेस सुरू केले असून त्यासाठी ‘सारथी’ संस्थेसोबत करार केल्याचेही त्यांनी सांगितले. कामथ म्हणाल्या की, २३ वर्षांपूर्वी एमकेसीएलची स्थापना झाली, तेव्हापासून आजतागायत प्रत्येकाला संगणक साक्षर करण्यासाठी एमएस-सीईटी कोर्स सुरू करण्यात आला. हा कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आता तब्बल दीड कोटींवर गेली आहे.
संगणक साक्षरतेबरोबरच ‘कॉम्प्युटरचा स्मार्ट उपयोग व मोठमोठ्या नोकऱ्यांसाठी उपयुक्त कौशल्य’ शिकण्याकडे कल दिसून येत आहे. संगणकाचे फायदे बहुआयामी आणि दूरगामी आहेत हा विचार समोर ठेऊन एमकेसीएलकडून डिझाईन करण्यात आलेल्या नवनवीन कोर्सेसचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सारथीसोबत मोफत शिक्षणाचा करार
कामथ म्हणाल्या की, सारथी संस्था काम करते अशा मराठा, मराठा-कुणबी समाजातील एमकेसीएलने नवीन चार कोर्स तयार केले आहेत. महत्त्वाचे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांच्या टीसीवर मराठा, कुणबी असा उल्लेख आहे, त्यांना हा कोर्स मोफत आहे. या मोफत कोर्ससाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सारथीशी करार करण्यात आला आहे. यावेळी कामथ यांच्यासह व्यवस्थापक कुणाल ओहाळ, मधुकर खिल्लारे यांची उपस्थिती होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.