आमदार रमेश बोरनारेंच्या अडचणीत वाढ,भावजयीने केले गंभीर आरोप

आमदार रमेश बोरनारे यांच्या अडचणीत वाढ
MLA Ramesh Bornare News
MLA Ramesh Bornare Newssakal
Updated on

औरंगाबाद : शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांच्या जाचाला कंटाळून त्यांच्या भावजयीने राज्याच्या गृहमंत्र्यांकडे आत्महत्या करण्याची परवानगी पत्राद्वारे मागितली आहे. या वर्षी १८ फेब्रुवारी रोजी आमदार बोरनारे व त्यांच्या कुटुंबीयांनी भावजयी जयश्री बोरनारेंसह त्यांच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी जयश्री बोरनारे यांच्या तक्रारीवरुन आमदार बोरनारेंसह इतरांवर वैजापूर (Vaijapur) येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर बोरनारे व त्यांचे कुटुंबीय जयश्री बोरनारे व त्यांच्या पतीचा छळ करित असून त्यांच्या घरावर दगडफेक करण्यात येते. (MLA Ramesh Bornare In Trouble, Woman Make Serious Allegation On Him)

MLA Ramesh Bornare News
पद्मसिंह पाटील यांचा आयुष्यभर आदर व सन्मानाच असेल, सुप्रिया सुळे भावूक

दुसरीकडे आमदारांच्या सांगण्यावरुन ग्रामस्थ व नातेवाईकांनी बहिष्कार टाकला असल्याचे जयश्री बोरनारे यांनी पत्रात म्हटले आहे. घरगुती कार्यक्रमाला बोलावू नका, असे आमदार बोरनारे नातेवाईकांना सांगत आहेत. त्यामुळे जयश्री व त्यांचे कुटुंबीय हताश झाले आहेत. आमदारांच्या सततच्या त्रासाला कंटाळून आता जगणे नकोसे झाले असल्याचे जयश्री बोरनारे यांनी पत्रात म्हटले आहे. (Aurangabad)

MLA Ramesh Bornare News
महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता कधीच येणार नाही - संजय राऊत

पोलिसांकडून थातूरमातून कारवाई झाल्याने आम्ही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना आत्महत्येची परवानगी मागितली आहे. आत्महत्येस आमदार रमेश बोरनारे, संजय बोरनारे, दिनेश बोरनारे, रणजित चव्हाण व पोलिस जबाबदार राहतील असा इशारा जयश्री बोरनारे यांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()