‘सकाळ’ कार्यालय - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा घेऊन आम्ही निवडणूक लढवित आहोत. आम्ही त्यागमूर्तीच आहोत. आम्ही आधी आहुती टाकली. शिवसेनेतून बाहेर पडून हे सर्व घडवून आणणे एवढे सोपे नव्हते. ते सर्व गृहीत धरून बाहेर पडलो आणि आमचा उठाव आम्ही यशस्वी करून दाखविला, असे शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले.