Chhatrapati Sambhaji Nagar : मोबाइलच्या पासवर्डने घेतला पत्नीचा जीव!रागाच्या भरात रात्री पडली घराबाहेर, पहाटे आढळला मृतदेह

Crime News : मोबाइलच्या पासवर्डवरून वाद झाल्याने एका पत्नीने घराबाहेर पडून वाहनासमोर उडी घेतली की अपघात झाला, याचा तपास पोलिस करीत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे चार वर्षांचा मुलगा आणि पाच महिन्यांची मुलगी आईविना पोरकी झाली आहे.
Crime
Crimesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : रांजणगाव शेणपुंजी परिसरात राहणाऱ्या महिलेचा मोबाइलच्या पासवर्डवरून पतीसोबत वाद झाला. रागाच्या भरात ती रात्री साडेबाराला घराबाहेर पडली. गोलवाडी फाटा परिसरात वाळूजकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका वाहनाची तिला धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता, की यात तिच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला.

ही घटना गुरुवारी (ता. ११) पहाटे चारच्या सुमारास उघडकीस आली. मोनिका मोहनराव गोरे (वय ३५) असे मृताचे नाव आहे, अशी माहिती मोनिकाचा भाऊ संतोष टेकमाले यांनी दिली.टेकमाले यांनी दिलेली माहिती अशी : मोनिकाचा दहा वर्षांपूर्वी मोहनराव गोरे (रा. टेंभुर्णी, जि. नांदेड) यांच्यासोबत विवाह झाला.

नोकरीनिमित्त हे कुटुंब रांजणगावत आले. त्यांना एक चार वर्षांचा मुलगा, एक पाच महिन्यांची मुलगी आहे. मोनिका बाळंतपणासाठी आईकडे होती. पंधरा दिवसांपूर्वी ती रांजणगावात आली. पतीने मोबाइलला पासवर्ड टाकल्यामुळे दोघांमध्ये वाद झाला होता. मोनिकाच्या माहेरच्यांनी समजूत घालून प्रकरण मिटविले. परंतु, बुधवारी रात्री पती-पत्नीमध्ये पुन्हा खटके उडाले. मोनिका रात्री साडेबाराच्या सुमारास घराबाहेर पडली. पहाटे तिचा मृतदेह आढळला.

आत्महत्या की अपघात?

मोनिकाने वाहनासमोर उडी घेऊन आत्महत्या केली, की अपघात झाला याचा तपास पोलिस करीत आहेत. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

बाळाला कोण पाजणार?

मोनिकाला चारवर्षीय मुलासह पाच महिन्यांची मुलगी आहे. या बाळाला आता दूध कोण पाजणार, आई काय असते हे कळण्यापूर्वीच तिची आई कायमचेच जग सोडून गेली. दोन्हीही मुलं पोरकी झाली. मोनिकाचं रोज भाऊ, आई-वडील यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलणं होत होतं. पण, बुधवारी देवीच्या यात्रेमुळे त्यांचं बोलणं झालं नसल्याचेही भाऊ टेकमाले यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.