Girl Ran From House: "मम्मी, पप्पा माफ करा, मी लग्न केले आहे," चिठ्ठी लिहून तरुणीचे घरातून दुसऱ्यांदा पलायन

मुलीच्या आईने घरी येऊन पाहिले असता त्यांची मुलगी शैक्षणिक कागदपत्रे सोबत घेऊन गेल्याचे दिसून आले.
Girla Ran From House
Girla Ran From HouseEsakal
Updated on

'मम्मी, पप्पा मला माफ करा, मी लग्न केले आहे', अशी चिठ्ठी लिहून ठेवत तरुणी घरातून निघून गेली. सोमवारी (ता. ३०) सकाळी साडेनऊ वाजता हा प्रकार तारांगणनगर, गारखेडा भागात घडला.

ही तरुणी जानेवारीतही अल्पवयीन असताना घरातून निघून गेली होती. त्यावेळी पोलिसांनी तिचा शोध घेत संशयितावर पोक्सोअंतर्गत गुन्हा नोंद केला. या मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आता याच आरोपीवर अपहरणाचा गुन्हा नोंद झाला. या प्रकरणी मुलीच्या आईने तक्रार दाखल केली.

यामध्ये ही महिला आणि तिचा पती सोमवारी कामासाठी सकाळीच सात वाजताच घरातून बाहेर पडले होते. साडेनऊ वाजता या महिलेच्या शेजारील महिलेने तिला कॉल केला. तुमची मुलगी साडी नेसून आणि बॅग सोबत घेऊन घराबाहेर पडल्याची माहिती तिने दिली.

मुलीच्या आईने घरी येऊन पाहिले असता त्यांची मुलगी शैक्षणिक कागदपत्रे सोबत घेऊन गेल्याचे दिसून आले. मुलीने लिहिलेली चिठ्ठी घरात आढळली. यामध्ये 'मम्मी, पप्पा, माझ्याकडून मोठी चूक झाली.

Girla Ran From House
Kham River Project : खाम नदी प्रकल्पाचा अमेरिकेत गौरव,पटकावला आंतरराष्ट्रीय पुरस्कार अन् २५ हजार डॉलर्सचे बक्षीस

मी यानंतर तुम्हाला तोंड दाखवणार नाही. मला शोधूपण नका. मला माफ करा, मी लग्न केले आहे' असा मजकूर आहे. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीमध्ये, यापूर्वदिखील ही मुलगी जानेवारी २०२४ मध्ये घरातून निघून गेली होती.

पोलिसांनी तिला आणि संशयित आरोपी करण चंद्रकांत तुरुकमाने (वय २१ रा. बालाजीनगर) याला पकडून आणले होते. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात करणवर गुन्हा नोंद होता. या मुलीला आतादेखील करण याने पळवून नेल्याचा संशय मुलीच्या आईने तक्रारीत व्यक्त केला असून या प्रकरणी पीएसआय राऊत तपास करीत आहेत.

Girla Ran From House
Chhatrapati Sambhajinagar : पर्यटकांची पावले वळणार शहराकडे!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()