Chhatrapathi Sambhajinagar Rain : तहानलेल्या भूमीवरी...पडल्या मृगाच्या सरी

पहिल्या दिवशी मृगाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या.
Rain in Chhatrapathi Sambhajinagar
Rain in Chhatrapathi Sambhajinagarsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - मृग नक्षत्राला शुक्रवारपासून (ता. सात) सुरवात झाली. या नक्षत्राच्या पहिल्या दिवशी शहरात मृगाच्या सरी कोसळल्या आणि ‘माउलीच्या दुधापरी आले मृगाचे तुषार, भुकेजल्या तान्ह्यासम तोंड पसरी शिवार’ या शाळेतील कवितेच्या ओळी ओठांवर आल्या. मृग नक्षत्राचे कोल्ह्यावरून आशादायी आगमन झाले अन् तहानलेल्या भूमीला मृगाच्या सरींनी तृप्त केले.

मृग नक्षत्रापासून पावसाळा सुरू होतो. त्यानुसार सात जूनला पहिल्या दिवशीच पाऊस आल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. उकाड्यापासून काही अंशी दिलासा मिळाला आहे. हवामान विभागासह हवामानतज्ज्ञांनी यंदा पावसाचे चांगले संकेत दिले आहेत. बहुतांश ठिकाणी कोल्हा गरजला, मृग बरसला आणि शेतरी शेतकरी आनंदले आहेत. ७ जूनला मृग नक्षत्राला प्रारंभ होतो. या नक्षत्राला हमखास पाऊस पडण्याचा अंदाज असतो.

यंदाही हा अंदाज तंतोतंत खरा ठरला. पहिल्या दिवशी मृगाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मॉन्सूनचे मराठवाड्यात १२ जूनपर्यंत आगमन होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. असे असले तरी पूर्व मोसमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दिवसभर उकाडा जाणवत असून, सायंकळी आकाशात ढग जमून येत आहेत. शुक्रवारी पहाटेच पावसाने हजेरी लावली.

झोपेतून उठलेल्या नागरिकांचे रिमझिम पावसाने स्वागत केले. त्यानंतर दिवसभर उन्ह तापलेलेच होते. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरवात झाली. कुठे हलका तर कुठे जोरदार पाऊस झाला. त्यामुळे रस्त्यावर पाणी वाहत होते. या पावसामुळे तापमानात काही प्रमाणात घट झाली. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. या पावसाची चिकलठाणा वेधशाळेत २.६ मिलिमीटर एवढी नोंद झाली आहे.

.... हुमनी भुंग्याचा बंदोबस्त करावा

कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डाॅ. किशोर झाडे यांनी सांगितले, आता पाऊस पडला आहे. या पावसाने जमीनीतून हुमनी भुंगे बाहेर येतील. यांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात रात्रीच्यावेळी लाईट लावून त्याखाली टोपल्यात किंवा बकेटीत पाणी ठेवावे. त्या पाण्यात कोणतेही किटकनाशक टाकावे. लाईटीच्या आकर्षणाने तिथे हुमनी भुंगे येतात आणि त्या पाण्यात पडून मरतात अशा प्रकारे त्यांचा बंदोबस्त करण्याचा झाडे यांनी सल्ला दिला आहे.

मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी जरी पाऊस आला असला तरी हा माॅन्सूनपूर्व पाऊस आहे. आता कुठे माॅन्सून कोकणात दाखल होत आहे. आपल्याकडे पुढच्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. तथापि ज्या शेतकऱ्यांची खरिपपूर्व शेवटच्या मशागतीची कामे करायची राहिली असतील तर ती करुन घ्यावीत.

- डॉ. किशोर झाडे, कार्यक्रम समन्वयक , कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.