छत्रपती संभाजीनगर : दरवर्षी शहरातील नागरिक कोजागिरी पौर्णिमेची रात्र जागून घरोघरी पूजा करतात. रात्री चंद्र माथ्यावर आल्यानंतर त्याचे दुधात प्रतिबिंब बघून नंतर ते प्राशन करतात. शनिवारी (ता.२८) कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री खंडग्रास चंद्रग्रहण आल्यामुळे नागरीकांना चंद्राला आटविलेल्या दुधाचा नैवेद्य दाखवता आला. मात्र या दुधाचा प्रसाद प्राशन करता आला नाही, त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला.
हिंदू धर्मामध्ये कोजागरी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. नवरात्री संपल्यानंतर लगेच कोजागरी पौर्णिमेची तयारी ठिकठिकाणी सुरू होते. कोजागरी पौर्णिमा आणि चंद्रग्रहण असा योग ९ वर्षानंतर जुळून आला आहे. यापूर्वी कोजागरी पौर्णिमेला चंद्रग्रह असा योग २०१४ साली जुळून आला होता. त्यानंतर अशीच स्थिती यंदा जुळून आली आहे. या पौर्णिमेला धर्मशास्त्रात खास स्थान आहे.
पुरोहीत सुरेश केदारे यांनी सांगितले, की कोजागरीच्या मध्यरात्री ऐरावतारूढ इंद्र आणि लक्ष्मी यांची पूजा करावी दोन्ही संपत्तीकारक देवता आहेत. मध्यरात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते. जे यादिवशी पूजन करत असतात, त्यांच्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होऊन तिथे स्थिरावते. २८ व २९ ऑक्टोबरच्या रात्री १:०५ ते २:२३ या कालावधीत खंडग्रास चंद्र ग्रहण दिसणार आहे. धर्मशास्त्रानुसार ग्रहण काळात पूजन करता येते.
त्यामुळे सर्वांनी दरवर्षीप्रमाणे इंद्र, चंद्र, लक्ष्मी यांचे पूजन करावे आणि आटवलेल्या दुधाचा नैवेद्यही दाखवावा. मात्र, तो प्रसाद प्राशन करता येणार नाही. दुसऱ्या दिवशी हा प्रसाद प्राशन करता येईल. परंतु, नैवेद्य दाखवताना तुळशीपत्र किंवा दर्भ ठेवून चंद्राला नैवेद्य दाखवावा म्हणजे दोष लागणार नाही, असे देखील श्री. केदारे गुरुजींनी सांगीतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.