Chhatrapati Sambhaji Nagar : अवघ्या २२ सेकंदांत २२ वार! कोमातून बाहेर आलेल्या माथेफिरूने मजुराच्या शरीराची केली चाळणी

Chhatrapati Sambhaji Nagar : सहा महिने कोमात राहिल्यानंतर बाहेर आलेल्या तरुणाने मजुरावर चाकूने २२ वार करत खून केला. या थरारक घटनेचा सीसीटीव्हीत कैद झालेला व्हिडिओ उपलब्ध झाला आहे.
murder in osmanpur chhatrapati sambhajinagar
Chhatrapati Sambhaji Nagarsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : सहा महिने कोमात राहिल्यानंतर बाहेर आलेल्या माथेफिरू तरुणाने मजुरावर चाकूने सपासप वार करीत त्याचा निर्घृण खून केला. मंगळवारी (ता. आठ) पहाटे पाच वाजता उस्मानपुरा परिसरातील नागसेननगर भागात हा थरारक प्रकार घडला. या घटनेत आरोपीने मजुरावर २२ सेकंदांत २२ जीवघेणे वार करीत त्याला जागेवर संपवले.

हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिसांनी आरोपीला काही वेळात अटक केली असून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अशोक दादाराव शिनगारे (वय ४६) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

याप्रकरणी मृत अशोक शिनगारे यांचा मुलगा आशिष याने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. आशिषचे वडील मंगळवारी पहाटे पाच वाजता फिरायला जाण्यासाठी घराबाहेर पडले होते. यावेळी अशोक शिनगारे हे फिरत असताना त्यांच्या ओळखीचा संशयित आरोपी निखिल शिंगाडे (रा. नागसेननगर) हा त्रिभुवन चौकातून समोरून येऊन शिनगारे यांच्याजवळ येऊन बोलत होता.

यावेळी प्रज्योत शिंगाडे आणि अक्षय गायकवाड हे दोघे देखील त्या ठिकाणी येऊन उभे होते. बोलता-बोलता अचानक निखिलने शिनगारे यांची कॉलर पकडत बाचाबाची सुरू केली. त्यानंतर संशयिताने त्याच्या जवळील चाकूने शिनगारे यांच्यावर हल्ला चढवला. शिनगारे यांच्या पाठीवर, मानेवर, तोंडावर सातत्याने वार केले.

शिनगारे खाली कोसळल्यानंतर देखील आरोपी वार करीत होता. चाकूने हल्ला केल्यानंतर तेथे उभे असलेले प्रज्योत आणि अक्षयने घाबरून पळ काढला. हल्ला केल्यानंतर संशयित आरोपी निखिल शांततेत तेथून निघून गेला. मोठा रक्तस्राव झाल्याने शिनगारे यांचा जागीच मृत्यू झाला.

काही नागरिकांनी शिनगारे यांच्या घरी धाव घेत हा प्रकार कळवला. शिनगारे कुटुंबीय घटनास्थळी धावत आले. डायल ११२ वर कॉल करून ही माहिती देण्यात आली. उस्मानपुरा पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. शिनगारे यांना घाटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले असता त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

घटना घडल्यानंतर निखिल तेथून निघून गेला होता. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्यामुळे आरोपीचा माग काढणेही सोपे झाले आहे. परंतु, या प्रकारामुळे शहरातील सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नागसेननगर भागातील रहिवासी दहशतीखाली आहेत.

सीसीटीव्ही आधारे पोलिसांनी आरोपीचा त्याचा शोध घेतला असता परिसरातच तो एका शटरजवळ झोपलेला आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. दुपारी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एपीआय शिवाजी चौरे तपास करीत आहेत.

सोबतचे दोघे गेेले पळून

शिनगारे यांच्यावरील हल्ल्याचा हा सर्व प्रकार तेथे असलेल्या एका घराबाहेरील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. अडीच मिनिटांची ही क्लिप आहे. यामध्ये शेवटच्या काही क्षणात थरारक प्रकार कैद आहे. यामध्ये निखिल सारखे चाकूचे वार करताना दिसत आहे. शिनगारे खाली पडल्यानंतर देखील हे सुरू होते. सोबतचे दोघे पळून गेल्याचेही यामध्ये दिसत आहे. हल्ल्यानंतर आरोपी शांततेत जाताना दिसत आहे.

कोमातून बाहेर पडल्यानंतर दहशतीसाठी कृत्य केल्याचा संशय

निखिलवर गेल्या वर्षी नागसेननगर भागातीलच काही तरुणांनी चाकूने हल्ला केला होता. यामध्ये त्याच्या गळ्याला गंभीर जखम झाली होती. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. निखिलला गंभीर जखम झाल्यामुळे तो सहा महिने कोमात होता. गेली काही महिन्यांत त्याची प्रकृती मूळ पदावर येत होती. मात्र, त्याने त्याच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना इशारा देण्यासाठी हे निर्घृण कृत्य केल्याची शंका पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी व्यक्त केली.

पोलिस ठाण्यासमोर अंत्ययात्रा थांबवली

शिनगारे यांचे शवविच्छेदन घाटीत करण्यात आले. यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. प्रतापनगर येथील स्मशानभूमीत अंत्ययात्रा घेऊन जात असताना जमावाने ही अंत्ययात्रा उस्मानपुरा पोलिस ठाण्याबाहेर थांबवली. यावेळी जमावाने काही काळ ठिय्या देत परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे हा प्रकार झाल्याचा आरोप केला. नातेवाइकांची समजूत काढल्यानंतर मृतदेह हलवण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.