Nagar - Kopargaon Highway: पहिल्या पावसातच महामार्गाचे तीनतेरा, प्रवास ठरतोय जीवाशी खेळ; प्रशासनाचे दुर्लक्ष

Maharashtra Bad Roads : सरकारी यंत्रणा आणि आमदार खासदारांचे याकडे होणारे दुर्लक्ष दुर्दैवी आहे.
 पहिल्या पावसातच महामार्गाचे तीनतेरा, प्रवास ठरतोय जीवाशी खेळ; प्रशासनाचे दुर्लक्ष
Nagar - Kopargaon Highwaysakal
Updated on

Shirdi latest Update | देशातील एक महत्त्वाचा रस्ता, अशी ओळख असलेला, नगर-कोपरगाव राष्ट्रीय महामार्ग गेल्या वीस वर्षांपासून उद्धाराच्या प्रतीक्षेत आहे. जड वाहतुकीचा मोठा ताण असलेल्या या राष्ट्रीय महामार्गाचा पुरता खेळखंडोबा झाला. काही भागात नव्याने रस्ता केला. त्याचे पहिल्या पावसात तिनतेरा वाजले.

खड्डे व उंच-सखल भागामुळे पहिल्याच पावसात रस्त्यावर तळी साचून त्यात जड वाहने फसण्याचा धोका निर्माण झाला. या महामार्गावरून प्रवास म्हणजे थेट जिवाशी खेळ, अशी स्थिती आहे. सरकारी यंत्रणा आणि आमदार खासदारांचे याकडे होणारे दुर्लक्ष दुर्दैवी आहे.

 पहिल्या पावसातच महामार्गाचे तीनतेरा, प्रवास ठरतोय जीवाशी खेळ; प्रशासनाचे दुर्लक्ष
Shirdi Constituency Lok Sabha Election Result : शिवसेना ठाकरे गटाने पेटवली मशाल; जनतेने भाऊसाहेब वाकचौरे यांना दिली दिल्लीत जाण्याची संधी

कोल्हारजवळ काही ठिकाणी नव्याने केलेल्या रस्त्याची वाट लागली. पुढे राहुरी ते नगर या अंतरात बऱ्याच ठिकाणी हा रस्ता सध्याच आपले अस्तित्व हरवून बसला. काही ठिकाणी खोदून ठेवलेला भाग तसाच आहे. नव्याने भराव टाकून त्यावर घाईने डांबरीकरण केले. थोड्याशा पावसात या भरावातून पाण्याचे प्रवाह वाहायला सुरवात झाली.

हलक्या पावसात फुगलेला हा रस्ता जड वाहनांच्या वाहतुकीमुळे चक्क गोळा झाला. त्यावर मोठाले खड्डे पडले. जोराचा पाऊस झाला तर या रस्त्याला तळ्याचे स्वरूप येईल. त्यात जड वाहने फसतील, अशी बिकट अवस्था आहे.

 पहिल्या पावसातच महामार्गाचे तीनतेरा, प्रवास ठरतोय जीवाशी खेळ; प्रशासनाचे दुर्लक्ष
Shirdi News : रूपवतेंनी बिघडवले गणित; शिर्डी मतदारसंघात विखे-थोरातांची प्रतिष्ठा पणाला

गमतीचा भाग असा की रस्त्याची पुरती वाट लागलेली असताना भर पावसाळ्यात रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम देखील सुरू आहे. त्याची गती एवढी संथ आहे की या वेगाने पुढील दहा वर्षे देखील हे काम पूर्णत्वाला जाण्याची सुतराम शक्यता नाही. एका बाजूला काम सुरू आणि दुसऱ्या बाजूला नव्याने बांधलेला रस्ता अक्षरशः गोळा होतो आहे.

रस्ता वाहतुकीसाठी कमालीचा धोकादायक झाला. खड्डे आणि खोदलेल्या भागातून वाट काढत वाहने चालविताना अवजड वाहनांच्या चालकांची दमछाक होते. या गर्दीतून चालणारी छोटी वाहने आणि दुचाकीस्वारांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.

 पहिल्या पावसातच महामार्गाचे तीनतेरा, प्रवास ठरतोय जीवाशी खेळ; प्रशासनाचे दुर्लक्ष
Samruddhi Highway Accident : समृद्धी हायवेवर कारला अपघात;दोन गंभीर जखमी, कारली गावानजीकची घटना

सावळीविहीर ते कोपरगाव या अंतरात या रस्त्याला नवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक मिळाला. एका बाजूने काँक्रिटिकरणाचे काम सुरू आहे. मात्र दुसऱ्या बाजूचा रस्ता व्यवस्थीत करण्यात आला नाही. त्यावर खड्डे आणि मोठाले उंचवटे आहेत.

ते चुकविताना जड वाहने उलटत आहेत. अशा वेळी रस्त्यावर जाणारी अन्य वाहने आणि मोटारसायकलस्वारांच्या जिवावर बेतू शकते. हा रस्ता दुरुस्त का केला जात नाही, हे समजायला मार्ग नाही.

तात्पुरत्या डागडुजीची गरज

नगर ते कोपरगाव या अंतरातील हा राष्ट्रीय महामार्ग मोठा पाऊस झाला की काही ठिकाणी वाहतुकीयोग्य तरी राहील की नाही, असा प्रश्न आहे. वाहतुकीसाठी अतिशय धोकादायक झालेल्या या रस्त्याची पावसाळ्यापुरती तरी डागडुजी करणे गरजेचे आहे. हे काम युद्धपातळीवर न केल्यास या रस्त्यावरून प्रवास करणे जिकीरीचे होणार आहे. विशेष म्हणजे या गंभीर समस्येकडे कुणाचेही लक्ष नाही.

 पहिल्या पावसातच महामार्गाचे तीनतेरा, प्रवास ठरतोय जीवाशी खेळ; प्रशासनाचे दुर्लक्ष
Kerala High Court: आई-वडीलांचं प्रेम वेगळं अन्...; मुलीला जीवनसाथी निवडण्यापासून कोणी रोखू शकत नसल्याचा हायकोर्टाचा निर्वाळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.