औरंगाबाद : सध्या लोकसभेतील (Lok Sabha) ५४३ खासदारांची संख्या वाढवून १ हजार करण्यात येणार आहे. त्यात उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, राज्यस्थान या राज्यात ६०० ते ६५० खासदारांच्या जागा द्यायच्या आणि दक्षिण, पूर्वांचल भागातून ३५० ते ४०० खासदारांच्या जागा देण्याचा डाव आहे. यातून कायम हिंदु पट्ट्यातील संख्येच्या आधारावर हिंदुत्वावादी सरकार दिल्लीत कायम राहील, असा डाव आखला जात असल्याचा दावा राज्यसभेतील खासदार तथा पत्रकार कुमार केतकर (Kumar Ketkar) यांनी केला आहे. यातून देश पुन्हा फाळणीच्या दिशेने जाणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.लोकसंवाद फाऊंडेशतर्फे (Aurangabad) अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day) खासदार केतकर यांचे ‘भारत : काल, आज आणि उद्या’विषयावर रविवारी ऑनलाईन व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे होते.
यावेळी श्री.केतकर म्हणाले, कायमस्वरुपी हिंदुत्ववादी सत्ता देशावर राखण्याचा प्रयत्नातून देशात अस्वस्थता वाढणार आहे. काश्मीर, पंजाब, तामिळनाडू, मिझोराम, आसाम आदी राज्यांतून स्वतंत्र होण्याची मागणी पुढे येऊ शकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचंड आत्ममग्न नेतृत्व आहे. सर्व काही मीच करतो हे दाखविण्याचा प्रयत्न ते करतात. त्यांची वाटचाल ही हुकूमशाहीकडे सुरू असल्याची टिकाही कुमार केतकर यांनी केली. डॉ.गव्हाणे यांनी मागील ७५ वर्षांत झालेल्या विकासात्मक कामाचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे, असे आवाहन केले. प्रस्ताविक संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेश करपे यांनी केले. सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले. डॉ. गणेश मोहिते यांनी आभार मानले.
नेहरू, गांधींमुळेच प्रगती
स्वातंत्र्यावेळी केवळ १ कोटी लोक मध्यमवर्गात होते. आज ती संख्या ४० कोटींपर्यंत पोहोचली. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून नियोजनबद्धपणे उच्चशिक्षण संस्था स्थापन केल्या. यातुन शिक्षण घेऊन असंख्य विद्यार्थी परदेशात गेले. इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण करून खेडोपाडी आर्थिक कर्जाची उपलब्धता करून दिली. हरितक्रांती झाली. राजीव गांधी यांच्या तंत्रस्नेही धोरणामुळे भारत जगात संगणक तंत्रज्ञानाचा हब बनला. या धोरणांमुळेच देशातील मध्यमवर्गाची संख्या वाढली, हेच देशाच्या प्रगतीची कारणे असल्याचेही श्री.केतकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.