सुशांतला मिळाली अमेरिकन क्रिकेट संघात अष्टपैलू खेळाडूची संधी

sushant
sushant
Updated on
Summary

अमेरिकेच्या राष्ट्रीय क्रिकेट संघात निवड झाली असून मस्कट येथे ओमन विरुद्ध ६ आणि ९ सप्टेंबरला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय एकदिवशीय सामन्यात तो खेळणार आहे.

औरंगाबाद: आर्थिक परिस्थितीमुळे मेडिकल सोडून इंजिअरींगला प्रवेश घ्यावा लागलेल्या औरंगाबादच्या सुशांत मोदाणी आता अमेरिका क्रिकेट संघाकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याची अमेरिकेच्या राष्ट्रीय क्रिकेट संघात निवड झाली असून मस्कट येथे ओमन विरुद्ध ६ आणि ९ सप्टेंबरला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय एकदिवशीय सामन्यात तो खेळणार आहे.

sushant
औरंगाबाद: पावसाअभावी पिके करपली; पाहा व्हिडिओ

सुशांतच्या यशाने हरखुन गेलेली आई ‘सकाळ’सोबत बोलल्या, सुशांतने खुप संघर्ष केला. वयाच्या आठव्या वर्षापासून त्याला क्रिकेटची आवड लागली. त्याने खुप मेहनत घेतली. त्याचा स्वभाव शांत, मनमिळावू असा आहे. खेळामुळे तो शाळेत जाऊ शकला नाही. तिथल्या प्राचार्यांनी त्याची उपस्थितीच अत्यल्प असल्याने परीक्षेला बसू देणार नाही, असे कळविले होते. विनंती केल्यानंतर परीक्षा दिली तर त्याने ८४ टक्के गुण घेतले होते. खेळासोबत त्याने शाळेतही चमकदार कामगिरी दाखवली होती.

sushant
औरंगाबाद शहराला मिळणार अतिरिक्त एक हजार कोटींचा निधी!

सुशांत परिस्थितीनुसार वागतो. त्याचा मेडिकलसाठी राज्याचा १२७५ रँक होता. अंबाजोगाईला त्याचा नंबर लागला होता. मात्र त्याला औरंगाबादच्या मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळाला नाही म्हणून त्याने इंजिनिअरींग क्षेत्रात करिअर करण्याचे ठरवले. आर्थिक परिस्थितीमुळे त्याने हा निर्णय घेतला होता. त्यातून क्रिकेट खेळायला मिळावे हादेखील त्याचा उद्देश होता. नोकरी करतानाही त्याने शनिवारी, रविवारी सराव करणे सोडले नाही. आज मिळालेले यश हे साऱ्या कुटुंबाला आनंद देणारे आहे, अशी भावना सुशांतची आई सुरेखा मोदानी यांनी सकाळकडे व्यक्त केली.

sushant
औरंगाबाद-नगर महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा!

सुशांतने आठव्या वर्षी क्रिकेटला सुरुवात केली. १३, १६, १९ आणि खुल्या गटात त्याने औरंगाबादचे प्रतिनिधत्व केले. १९ वर्षाखालील महाराष्ट्र संघाकडून तो एक सत्र खेळला. मराठवाडा सांस्कृतीक मंडळावर त्याने दिनेश कुंटे आणि एम अॅड के अकादमीत सराव केला. जेएनईसीतून इंजिनिअर झाल्यानंतर नोकरीनिमित्त अमेरिकेत स्थायिक झाला. तिथेही खेळ सुरुच ठेवला. अमेरिकेतील बिस्टा लॉरेन्स प्रीमियर लीगमध्ये शतकी खेळीने लक्ष वेधले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.