Sambhaji Nagar : महामार्गालाच बनवले वाहनतळ ; खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना शिस्त लावण्याची गरज

येथून जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर-नगर महामार्गावर खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने अस्ताव्यस्त, वेड्यावाकड्या स्थितीत उभी केली जात आहेत. या वाहनांमुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. परिणामी, सतत वाहतूक कोंडी होत असून, परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
sambhaji nagar
sambhaji nagarsakal
Updated on

वाळूज : येथून जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर-नगर महामार्गावर खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने अस्ताव्यस्त, वेड्यावाकड्या स्थितीत उभी केली जात आहेत. या वाहनांमुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. परिणामी, सतत वाहतूक कोंडी होत असून, परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. हा महामार्ग आहे की वाहनतळ असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

sambhaji nagar
Sambhaji Nagar : शिवना, सिल्लोडच्या जागेसाठीच बोली ; मालमत्तांच्या लिलावासाठी पुन्हा मुदतवाढ

वाळूज औद्योगिक वसाहतीमुळे या मार्गावर कायम जड वाहनांची वर्दळ असते. वाहतूक कोंडीमुळे सकाळ-सायंकाळ अनेकदा वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागतात. यामुळे महामार्ग ओलांडणे कठीण होऊन बसते.त्यातून रोज अपघाताचा धोका आहे. यातच येथील नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या कमलापूर टी पॉइंटवर खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या अॅपेरिक्षांचा थांबा आहे.

महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी विविध दुकाने आहेत. त्यात प्रामुख्याने उपहारगृहे, हार्डवेअर, केशकर्तनालय, टेलरिंग, किराणांसह फळ विक्रेत्यांचा समावेश आहे. या दुकानात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची वाहनेही महामार्गावर उभी असतात. या मुख्य महामार्गावर असलेल्या खासगी प्रवासी वाहतुकीच्या कमलापूर टी पॉइंटवरील वाहने अस्ताव्यस्त लावली जातात. ही चालक मंडळी अनेकदा आपली वाहने वेडीवाकडी लावतात. त्यांच्यावर कुणाचाही वचक नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहेत.

सायंकाळी कंपन्यांतील कामगारांची शिफ्ट संपते. त्यामुळे या महामार्गावर मुंग्या सारखी वाहनांची रांग असते. त्यातच रिक्षा बेशिस्तीत उभ्या असतात. अशावेळी वाहतूक पोलिस नसल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही. पोलिसांच्या वाहतूक शाखेने लक्ष देऊन कारवाई करावी.

- दाऊद शेख, मनीषानगर, वाळूज.

प्रवाशांशी अरेरावी

खासगी प्रवासी वाहतूक करणारे काही चालक नेहमीच आक्रमक भूमिका घेतात. एखाद्या वाहनाला अडथळा निर्माण झाल्यास समजावण्याचा प्रयत्न केल्यास खासगी वाहनाचे चालक एकत्र येत सर्वजण संबंधितांशी अरेरावी करतात. त्यामुळे या दादागिरीला पोलिसांनी आळा घालावा, अशी मागणी होत आहे.

हा महामार्ग कायम वाहतुकीच्या भाऊगर्दीत हरवला आहे. खासगी प्रवासी करणारे वाहनमालक आपली वाहने महामार्गावर उभी करून प्रवाशांची वाट बघत थांबतात. त्यामुळे रहदारीला अडथळा होऊन दुर्घटनेची शक्यता वाढते. त्यामुळे या वाहनचालकांना शिस्त लावण्याची आवश्यकता आहे.

- अंबादास सुरासे, साठेनगर, वाळूज.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()