...नऊवारी साडी नेसून इव्हेंट करण्याची गरज नाही, नीलम गोऱ्हेंची भाजपवर टीका

'भाजप राजकीय एन्काऊंटर करते.'
Shiv Sena leader Neelam Gorhe
Shiv Sena leader Neelam Gorheesakal
Updated on

औरंगाबाद : भाजपसारख शिवसेनेला गर्दी जमवण्यासाठी नऊवारी साडी नेसून इव्हेंट करण्याची गरज नाही. शिवसेनेच्या सभांना गर्दी आपोआप होत असते. गर्दी जमवण्यासाठी संभाजीनगर नामकरणाचा विषय सभेच्या निमित्ताने आणल्याच्या विरोधकांच्या टीकेला शिवसेना (Shiv Sena) नेत्या नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी उत्तर दिले. आज रविवारी (ता.पाच) औरंगाबाद (Aurangabad) येथील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी आमदार अंबादास दानवे, विनोद घोसाळकर, प्रतिभा जगताप, राजू वैद्य आदींची उपस्थित होते. (Neelam Gorhe Says, No Need For Shiv Sena To Gather Crowds In Rally)

Shiv Sena leader Neelam Gorhe
Tanaji Sawant|शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांच्या वाहनाचा अपघात

गोऱ्हे म्हणाल्या, कोविडमध्ये लोकांनी स्थलांतर केले. शिवसेना व शहराचे वेगळे नाते आहे. मलनिःस्सारण, मराठवाडा मुक्ती संग्रहालय, रस्ते, पाणीपट्टी कमी केली आदी कामे केले. त्याला निधी राज्य सरकारने दिला. भाजप राजकीय एन्काऊंटर करते. युतीबाबत खडसे यांनी खुलासा केला. आमच्याकडे पक्षनिष्ठा ठेवून कार्य करणारे लोक आहेत. त्यामुळे सत्ता टिकली. जनतेचा विश्वास आमच्यावर आहे, असे त्या म्हणाल्या.

Shiv Sena leader Neelam Gorhe
शरद पवार पुढाकार घेत नाही, तोपर्यंत देशात पर्यायी सरकार अशक्य, शिवसेना नेत्याचं विधान

राज्यसभानंतर विधानपरिषद गणित कसं जमवायचे यासाठी आम्ही सक्षम आहोत. गोपीनाथ मुंडेंचं वारसा म्हणजे काही अपेक्षा असून आमच्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदसाठी शुभेच्छा आहेत. पूर्वीच्या लोकांना समांतर बंद करावा लागला. त्याची पाळेमुळे केंद्रांत असून त्यांनी तत्कालीन कंत्राटदारावर कारवाई का केली नाही? आता मोर्चा काढतात, असा हल्लाबोल नीलम गोऱ्हे यांनी देवेंद्र फडणवीस व भाजपवर केला. शहराचे नामकरण करण्यासाठी केंद्राची परवानगी लागते. त्यांनी बैठक घेऊन मोदींकडून करुन घ्यावे, असा सल्ला त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांना दिला.

Shiv Sena leader Neelam Gorhe
घोडेबाजार करण्याचा प्रयत्न करू नका, आमचंही लक्ष्य आहे - संजय राऊत

घर वापसी फेल गेलं. नारायण राणे , कंगना राणावत, सोमय्यांना आदींनी सुरक्षा. पण काश्मिरमध्ये टार्गेट किलींग होत आहे. त्यांना मात्र केंद्र संरक्षण देत नाही. आता चर्चा नाही १० तारखेला फैसला होईल. व्हीपवरुन चंद्रकांत पाटलांवर गोऱ्हे यांनी टीका केली. राज्यातील सत्तांतर वेळी अपक्ष आमदारांना कोंडून ठेवले होते. सोमय्यांना ईडीबाबत कसे कळते. हे तर कुडमुडे ज्योतीषी असल्याचे त्या म्हणाल्या. मुख्यमंत्र्यांची सभा म्हणजे राजच्या सभेला उत्तर का? यावर म्हणाल्या दुर्बल झालेल्या बाबत मी काय बोलणार असा सवाल नीलम गोऱ्हे यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.