औरंगाबाद : महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय (IAS Astik kumar Pandey) यांनी महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी (Municipal Medical Officer) या पदावर दोघांची नियुक्ती करत कामाची वाटणी केली होती. पण आता डॉ. नीता पाडळकर यांचे अधिकार गोठविण्यात आले असून, सर्व अधिकार शासनाकडून प्रतिनियुक्तीवर महापालिकेत आलेले आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांना देण्यात आले आहेत. महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी या पदावर शासनाकडून प्रतिनियुक्तीवर अधिकारी दिला जातो. पण गेल्या काही वर्षांपासून रिक्त (Aurangabad) असलेल्या या पदाचा पदभार आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांच्याकडे देण्यात आला होता. कोरोना (Corona) संसर्गाच्या काळात देखील शासनाकडून या पदावर अधिकारी देण्यात आला नाही. त्यामुळे डॉ. पाडळकर यांनी संसर्ग कमी करण्यासाठी सक्षमपणे काम केले. दरम्यान दोन महिन्यापूर्वी शासनाने डॉ. पारस मंडलेचा यांची बीड येथून महापालिकेत (Aurangabad Municipal Corporation) प्रतिनियुक्तीवर बदली केली. त्यानुसार डॉ. मंडलेचा यांच्याकडे पदभार देणे अपेक्षीत होते.(neeta padalkar rights frozen, office charges give to paras mandelcha aurangabad glp88)
पण श्री. पांडेय यांनी आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्याची दोन पदे तयार केली. कोरोना संसर्गासंबंधी कामे त्यांनी डॉ. पाडळकर यांच्याकडे कायम ठेवली तर डॉ. मंडलेचा यांच्याकडे सर्व आरोग्य केंद्र, शासनाच्या योजनासंदर्भातील कामांची जबाबदारी दिली. मात्र एकाच पदावर दोन अधिकारी काम करत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. आता श्री. पांडेय यांनी नव्याने आदेश काढून डॉ. मंडलेचा यांच्याकडे आरोग्य विभागाच्या सर्व फाईल मंजूर करण्याचे व त्यावर निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. कोरोना संबंधीच्या फाईल मंजूर करुन त्या फाईल अंतिम मंजुरीसाठी आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्तांकडे पाठवण्याचे अधिकार डॉ. पाडळकर यांच्याकडे होते, ते आता डॉ. मंडलेचा यांच्याकडे देण्यात आले आहेत. डॉ. पाडळकर कोरोनाबाबतच्या कामांचे नियोजन करतील. पण त्यावर अंतिम निर्णय डॉ. मंडलेचा घेतील, असे आदेशात नमूद करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
राठोडकरांचा पदभार काढण्याचे आदेश
आरोग्य विभागाच्या भांडार विभागाचे प्रमुख डॉ. बाळकृष्ण राठोडकर यांचा पदभार काढण्याचा आदेश प्रशासकांनी देले आहेत. राठोडकर डॉ. मंडलेचा यांना सहकार्य करीत नसल्याची तक्रार प्रशासक यांच्याकडे करण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.