जालना : शहरातील गांधी चमन येथील जिल्हा स्त्री व बाल रूग्णालयातून सोमवारी (ता.सात) सकाळी एक दिवसांचे बाळ एका महिलेने लंपास केले आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून सीसीटीव्ह फुटेजची तपासणी करून शोध सुरू केला आहे. दरम्यान या घटनेनंतर रूग्णालयातील सुरक्षेबाबत प्रश्न चिन्हं निर्माण झाले आहे. जालना (Jalna) तालुक्यातील पारेगाव येथील रूकसाना अहमद शेख ही महिल प्रस्तृतीसाठी रविवारी (ता.सहा) रात्री दाखल झाली होती. रविवारी (ता.सहा) रात्री सहा वाजेच्या सुमारास या महिलेने एका मुलाला जन्म दिली. सोमवारी (ता.सात) सकाळी रूकसाना शेख यांच्या नातेवाईक महिलेने रूग्णालयातील डॉक्टर, परिचारीका यांना न विचारता बाळाला सकाळच्या कवळ्या उन्हात घेऊन गेल्या. (New Born Baby Stolen By Woman In Jalna)
दरम्यान या परिसरात रात्रीपासून फिरणाऱ्या एका महिलेकडे बाळाला देऊन त्या इतर कामात व्यस्त झाल्या. याचा फायदा घेऊन या संबंधित अनोखळी महिला हे एक दिवसांचे बाळ घेऊन पसार झाली. बाळ चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी रूग्णालय परिसरात शोधाशोध सुरू केले. तसेच या प्रकरणाची माहिती कदीम जालना पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळाल्यानंतर कदीम जालना पोलिसांनी जिल्हा स्त्री व बाल रूग्णालयात (Jalna District Woman Hospital) धाव घेत रूग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या बाळाला घेऊन जणारी महिला पोलिसांना दिसून आले असून या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.