Motivation News : कष्टातून फुलविले जीवन! वृत्तपत्र विक्री व्यवसाय आमची ‘लक्ष्मी’

ऊन, थंडी, पाऊस असो की आणखी कुठला अडथळा, आपल्या घरात रोज न चुकता वेळेत पेपर येतो. मात्र, शेकडो हातांचे कष्ट यामागे असतात.
kishor deshmukh and vishal deshmukh
kishor deshmukh and vishal deshmukhsakal
Updated on

ऊन, थंडी, पाऊस असो की आणखी कुठला अडथळा, आपल्या घरात रोज न चुकता वेळेत पेपर येतो. मात्र, शेकडो हातांचे कष्ट यामागे असतात. घरोघरी पेपर वितरित करणाऱ्यांमध्ये महिला, पुरुष, युवक अन् ज्येष्ठही आहेत. पहाटेपासून त्यांचा संघर्ष सुरू होतो. हा संघर्षच त्यांच्या जगण्याचे कारण बनलाय. अशाच काही कष्टकऱ्यांच्या संघर्षगाथा आम्ही या सदरातून मांडत आहोत.

गोली जिल्ह्यातील वडगाव या छोट्याशा गावातून दोन भावंडं छत्रपती संभाजीनगरमध्ये आली. तेरा-चौदा वर्षांच्या मुलांनी या नवख्या शहरात वृत्तपत्र टाकण्याचे काम सुरू केले. वयाच्या चौदाव्या वर्षी हे काम करताना त्यांनी घर सावरले आणि आपापला संसार उभा केला. कोणतेही पाठबळ नसताना पेपरविक्रीतच करिअर केले. त्यामुळे आमच्यासाठी ‘वृत्तपत्रविक्री व्यवसाय आमची लक्ष्मी आहे’, असे किशोर पांडुरंग देशमुख आनंदाने म्हणाले.

किशोर आणि त्यांचे लहान बंधू विशाल यांची ईटखेडा येथे स्वतःची न्यूजपेपर एजन्सी आहे. गावी शेती होती. पण, त्यातून फारसे उत्पन्न मिळायचे नाही. म्हणून किशोर व विशाल या भावंडांनी छत्रपती संभाजीनगर गाठले. मेहनत घेण्याची तयारी होती. सुरवातीला त्यांनी एका पेपर विक्रेत्याच्या हाताखाली पेपर वाटणे सुरू केले. किशोर यांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतले. नंतर मात्र ते पूर्णवेळ हेच काम करीत राहिले. विशाल यांनी पुढे शिक्षण घेतले.

त्यांनीही याच कामाला पसंती दिली. नंतर दोघांनी मिळून स्वतःची एजन्सी सुरू केली. रेल्वेस्टेशन, जालाननगर, तिरुपती सोसायटी, बीड बायपास आदी मोठ्या विस्तृत परिसरात मिळून त्यांच्याकडे दोन हजार अंक आहेत. यासाठी त्यांनी पाच तरुणांना रोजगार दिला आहे. इतक्या मोठ्या अंतरावर पेपरविक्री करण्यासाठी ते पहाटे चारपर्यंत एजन्सी गाठतात. पेपरविक्री व बिलिंगसाठी त्यांचा बराच वेळ जातो. दरम्यान, दोघांचे लग्न झाले.

आई शकुंतला आणि किशोर यांची पत्नी विद्या आणि मुली काव्या आणि धनश्री, तर विशाल यांच्या पत्नी शिवकन्या आणि मुली समृद्धी आणि देविका असे हे गोड कुटुंब गुण्यागोविंदाने एकत्र राहते. जेमतेम शिक्षण, नवख्या शहरात पेपरविक्रीचा व्यवसाय सुरू करताना या दोन्ही बंधूंना वाचकांची खूप साथ मिळाली. याच व्यवसायातून त्यांचे घर उभे झाले. आम्ही जे काम निवडले, त्यात आम्ही समाधानी तर आहोतच, शिवाय हा व्यवसाय आमची ‘लक्ष्मी’ आहे, असेही किशोर देशमुख यांनी नमूद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.