माझी आणि अंबादास दानवेंची बरोबरी होणे शक्य नाही - चंद्रकांत खैरे

औरंगाबादेत शिवसेनेतील नेते आमने-सामने
Chandrakant Khaire And Ambadas Danve
Chandrakant Khaire And Ambadas Danveesakal
Updated on

औरंगाबाद : सध्या औरंगाबादमध्ये शिवसेनेत राजकीय दुही दिसत आहे. याला निमित्त माजी खासदार चंद्रकांत खैरे व जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांचे शिवतेज व शिवसंवाद या दोन मोहिमा. दोघांचाही एकच पक्ष असताना असे का ? असा प्रश्न बहुतेकांना पडला आहे. याला पूर्णविराम देण्याचे काम खैरे यांनी केले आहे. शिवसेनेत पक्षप्रमुखांनंतर नेतेपद मोठे आहे. एकूण १३ नेत्यांपैकी मी एक आहे. त्यामुळे माझी आणि अंबादास दानवेंची (Ambadas Danve) बरोबरी होणे शक्य नाही, असे खैरे म्हणाले. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेला (Shiv Sena) ५५ ते ६० जागांची आशा असून औरंगाबाद (Aurangabad) महापालिकेत ५५ जागा मिळतील, असा दावा त्यांनी केला. (No Comparison With Ambadas Danve, Said Shiv Sena Leader Chankdrakant Khaire)

Chandrakant Khaire And Ambadas Danve
उमरग्याच्या माजी नगराध्यक्षा प्रेमलता टोपगेंना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

बुधवारी (ता.नऊ) संत एकनाथ रंगमंदिरात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. किशनचंद तनवाणी यांना चांगले पद मिळेल. ते भाजपमधून सेनेत आलेत. त्यांना मोठे पद मिळाल्यास ते भाजपला खिंडार पाडतील, असे चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) म्हणाले. महसूल मंत्री अब्दुल सत्तार आता हिरवे राहिलेले नाहीत ते भगवे झालेत. त्यांचे कार्यालयही भगवे झाले आहे. रेल्वे पीटलाईनवर ते म्हणाले, की रेल्वे राज्यमंत्र्यांना काही अधिकारी नसतात. अनेक वर्षे मी लोकसभेत रेल्वेच्या मुद्द्यांवर पाठपुरावा केला. तेव्हा काही मिळाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()