आमदार, गृहनिर्माण मंत्रिपद भूषवूनही मुंबईत घर नाही; चंद्रकांत खैरेंची खंत

'मागे वळून पाहिल्यास ३२ वर्षे झाली तरीही मुंबईत तसा मी बेघरच आहे.'
chandrakant khaire
chandrakant khairechandrakant khaire
Updated on

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील ३०० आमदारांना मुंबईत घरे देण्याची घोषणा केली आहे. त्यावरुन सध्या आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आमदारांना घरे देण्यास वैयक्तित विरोध असून आमदारांसाठी कोटा असा, असे ते म्हणाले. महाविकास आघाडीतील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आमदारांना घरे मोफत दिली जाणार नाहीत, असे सांगितले आहे. दुसरीकडे काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी आपण घर घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र शिवसेनेचे औरंगाबादचे (Aurangabad) माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी मुंबईत घर नसल्याची खंत व्यक्त केली आहे. (Not Own House In Mumbai, Shiv Sena Leader Chandrakant Khaire Said In Aurangabad)

chandrakant khaire
औरंगाबादमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, कुरिअर कार्यालयातून ३७ तलवारी जप्त

खैरे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, मुंबईत (Mumbai) अद्याप घर न मिळाल्याची खंत मला आजही सतावत आहे. आमदार आणि गृहनिर्माण मंत्रिपद भूषवूनही मला मुंबईत घर नाही. मागे वळून पाहिल्यास ३२ वर्षे झाली तरीही मुंबईत तसा मी बेघरच आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi Government) काळात घर मिळेल.

chandrakant khaire
जीवाची परवा न करता बहिणीला वाचवले, पण... कमावत्या भावाचा गेला जीव

या कारणामुळे आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत, असा आशावाद खैरे यांनी व्यक्त केला आहे. विदर्भात काहींनी मुख्यमंत्री ठाकरे यांचे बॅनर लावून आमदारांना घरे दिल्याबद्दल आभार मानले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.