OBC Reservation:...तर ओबीसी समाज पेटुन उठेल, सगेसोयरेच्या अटीवरुन सरकारला इशारा

Marathwada: देवगाव फाटा येथे ओबीसी समाजाचे रस्ता रोको,
OBC Reservation:...तर ओबीसी समाज पेटुन उठेल,  सगेसोयरेच्या अटीवरुन सरकारला इशारा
Updated on

Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसी मधुन आरक्षण देवु नये व सगेसोयरेची अट मान्य करु नये, मराठा समाजाच्या आरक्षणाला ओबीसींचा विरोध नसुन सगेसोयरेची अट मान्य केल्यास ओबीसीचे आरक्षण आपोआप संपुष्टात येईल.

त्यामुळे मराठा समाजाला स्वतंञ आरक्षण देण्यात यावे ओबीसीतुन नको तसेच वडीगोद्री येथे गेल्या अनेक दिवसांपासुन सुरू असलेल्या प्राध्यापक लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणुन गुरुवारी (ता.२०) रोजी सकाळी १० वाजता धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील देवगाव फाटा ता.पैठण येथे दोन्ही बाजुने महामार्ग आडवुन रस्ता रोको करण्यात आला.

OBC Reservation:...तर ओबीसी समाज पेटुन उठेल,  सगेसोयरेच्या अटीवरुन सरकारला इशारा
OBC Reservation : चर्चेसाठी शिष्टमंडळ मुंबईत जाणार नाही - लक्ष्मण हाके

यावेळी प्रा. हाके, नवनाथ वाघमारे, छगन भुजवळ, पंकजा मुंढे, महादेव जानकर, धनंजय मुंढे तुम आगो बढो अशा घोषणा देवुन वडीगोद्री येथे सुरु असलेल्या ओबीसींच्या उपोषणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याऱ्या मुख्यमंञी, उपमुख्यमंञ्यासह सरकार च्या विरोधात घोषणा बाजी करण्यात आली.

हा रस्ता रोको तब्बल एक तास चालला. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजुने दोन ते तिन किलो मिटर पर्यंत रांगा लागल्या होत्या यावेळी परिसरातील विस ते पंचविस गावातील शेकडो ओबीसी समाज बांधव यांची उपस्थित होते.

सरकारने वडीगोद्री येथे सुरु असलेल्या ओबीसी आंदोलनाची दखल घेतली नाही तर यापुढे राज्यात हिंसक आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलन कर्त्यांनी दिला. यावेळी सरपंच योगेश कोठुळे, उपसरपंच भास्कर गिते, सरपंच विनोद राठोड, सरपंच नवनाथ ढाकणे, सरपंच रामनाथ डिघुळे, सरपंच विक्रम जायभाये, सरपंच दत्तू दौंड, सरपंच अर्जुन वाघ, माजी सरपंच ज्ञानेश्वर वाघ, माजी उपसरपंच महादेव भिसे, गोरख चव्हाण, जय भगवान महासंघाचे बाळासाहेब सानप, सचिन डोईफोडे, सुदर्शन गिते, अमोल गिते, उद्धव गिते, शिवाजी चव्हाण,शिवलाल राठोड, पाटीलबा बोन्द्रे, बाळू गिते, दीपक ढाकणे, बाळू घुले, मुजीब शेख, जगन घुले, ज्ञानेश्वर दौड, सूर्यकांत पालवे, सतिश राठोड, भगवान दौड, अरुण गिते, शिवनारायण ढाकणे, सूर्यभान गिते, कृष्णा गिते, भरत गिते यांच्यासह शेकडो कार्यकर्ते हजर होते.

OBC Reservation:...तर ओबीसी समाज पेटुन उठेल,  सगेसोयरेच्या अटीवरुन सरकारला इशारा
OBC Reservation : ओबीसी समाजाचे आजपासून वडीगोद्री येथे साखळी उपोषण

आंदोलन स्थळी समाज बांधवांकडून नायब तहसीलदार विष्णू घुगे व संतोष अनर्थे, पेशकर कांबळे, मंडळ अधिकारी वैशाली कांबळे यांच्याकडे निवेदन देण्यात अले. यावेळी तलाठी भरत सवणे, तलाठी मुलवणे, कोतवाल आजीम शेख, बाबुभाई शेख यांची उपस्थिती होती. पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक शरदचंद्र रोडगे, उपनिरिक्षक ज्ञानेश्वर राडकर, अभिजित सोनवणे, फेरोज बर्डे यांच्या पोलीस कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवला होता.

OBC Reservation:...तर ओबीसी समाज पेटुन उठेल,  सगेसोयरेच्या अटीवरुन सरकारला इशारा
OBC Reservation : ओबीसी आरक्षणाबद्दल गैरसमज! आधी समजून घ्या वस्तुनिष्ठ इतिहास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.