Sambhaji Nagar : ‘इसिस’शी संबंधाच्या संशयावरून एकाला उचलले ; राष्ट्रीय तपास यंत्रणेची संभाजीनगरमध्ये कारवाई,नऊ ठिकाणी छापेमारी

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शहरात नऊ ठिकाणी छापे टाकत ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून एकाला उचलले. ही कारवाई १५ फेब्रुवारीरोजी हर्सूल पोलिस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली.
Sambhaji Nagar
Sambhaji Nagarsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शहरात नऊ ठिकाणी छापे टाकत ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून एकाला उचलले. ही कारवाई १५ फेब्रुवारीरोजी हर्सूल पोलिस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. मोहम्मद झोएब खान असे संशयिताचे नाव असून पथकाने त्याला अटक केली आहे, अशी माहिती ‘एनआयए’तर्फे जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धिपत्रकात दिली आहे.

प्रसिद्धिपत्रकानुसार ‘एनआयए’च्या पथकाने संशयिताच्या घरासह नऊ ठिकाणी छापे टाकले असून, या छाप्यात मोबाइल, लॅपटॉपसारखे इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स तसेच दहशतवादाशी संबंधित काही कागदपत्रे जप्त केली आहेत. संशयित मोहम्मद झोएबविरोधात मुंबई येथे गुन्हा दाखल आहे. विशेष म्हणजे, झोएबसह त्याच्या साथीदारांनी ‘इसिस’सोबत काम करण्यासाठी तसेच त्या दहशतवादी संघटनेशी बांधिलकी ठेवणार असल्याची शपथ घेतल्याचे समोर आले आहे. झोएबसह त्याच्या सहकाऱ्यांविरोधात तरुणांना ‘इसिस’मध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करणे, ‘इसिस’च्या विचारसरणीचा तरुणांमध्ये प्रचार-प्रसार करणे आदी जबाबदाऱ्या होत्या. झोएबसह त्याचे सहकारी सोशल मीडियावर तरुणांना हेरून त्यांना इसिसशी जोडून त्या संघटनेत तरुणांची भरती करण्यासाठी अग्रेसर असल्याचेही ‘एनआयए’ने म्हटले आहे.

हर्सूल पोलिसांत नोंद

राष्ट्रीय तपास यंत्रणेचे पथक शहरात दाखल झाले होते. संशयित हा हर्सूल पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याची माहिती पथकाला होती. त्यानुसार त्या पथकाने हर्सूल पोलिस ठाण्यात दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्या संशयिताला ताब्यात घेऊन जात असल्याची नोंद केल्याची माहिती स्थानिक पोलिस सूत्रांनी दिली.

संशयित खान वेब डिझायनर

मोहंमद झोएब खान (४०, रा. बेरीबाग, हर्सूल) वेब डिझाईनर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. तो काही महिन्यांपासून ऑनलाईन पद्धतीने ‘इसिस’च्या संपर्कात असल्याचे ‘एनआयए’च्या निदर्शनास आले होते, तेव्हापासून ‘एनआयए’कडून झोएबवर सूक्ष्म निरीक्षण सुरु होते. विशेष म्हणजे, याचा एकाही स्थानिक यंत्रणेला पत्ता लागला नव्हता, एटीएसलाही खबर नव्हती. मागील काही दिवसांपासून अधिक सक्रिय होत त्याने स्थानिक नेटवर्क तयार करण्याचेही काम हाती घेतले होते. तसेच, तो भारतात मोठा घातपात करण्याच्या तयारीला लागला होता. त्यापूर्वीच ‘एनआयए’ने त्याच्या घरात छापा मारला.

Sambhaji Nagar
Sambhaji Nagar : जन्मदात्यांना दूर लोटल्यास ॲक्शन ! ; प्रेमापोटी मुलांच्या नावावर केलेली मालमत्ता घेणार परत

शपथ घेतलेले व्हिडिओ समोर

महत्त्वाचे म्हणजे, झोएब खान आणि इतर संशयित साथीदार हे भारतासह परदेशातील नागरिकांसोबत ‘इसिस’ची दहशतवादी धोरणे पोचविण्यासाठी सतत संपर्कात होते. संशयित हे सीरियाला हिंसक जिहाद आणि हिजराशी संबंधित शपथ घेतलेले व्हिडिओ पाठवून संघटनेशी जोडण्यासाठी पुढाकार घेत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. दहशतवादविरोधी संस्थेने या प्रकरणाचा सखोल तपास करण्यास सुरवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.