इम्तियाज जलीलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; बाजारपेठा, व्यवसाय सुरु करण्याची मागणी

इम्तियाज जलील
इम्तियाज जलील
Updated on
Summary

औरंगाबाद शहरात व्यापारी अथवा दुकानदारांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर औरंगाबाद महापालिका, पोलिस विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे पथक अशा वेगवेगळ्या तीन पथकांकडून कार्यवाही केली जात आहे.

औरंगाबाद : 'ब्रेक द चेन' अंतर्गत (Break The Chain) उद्योगधंदे, बाजारपेठा उघडून सर्वप्रकारचे व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याकडे केली आहे. ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात जलील म्हणतात, की ब्रेक द चेन अंतर्गत औरंगाबाद (Aurangabad) शहरात, तर जिल्हा प्रशासनाच्या वतीने एक प्रकारे हुकुमशाहीच चालवली जात असल्याचे व्यापारी, दुकानदार व टपरीधारक प्रश्न उपस्थित करित आहेत. औरंगाबाद शहरात व्यापारी अथवा दुकानदारांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर औरंगाबाद महापालिका (Aurangabad Municipal Corporation), पोलिस विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे पथक अशा वेगवेगळ्या तीन पथकांकडून कार्यवाही केली जात आहे. विशेष म्हणजे तिन्ही पथकांचे आपापसात समन्वय नसल्याने व्यापारी व दुकानदारांना दंड आकारुन संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन दुकान ही सिल करण्यात येत आहे. ही तर एक प्रकारची हुकुमशाहीच असल्याचे समजते. सदरील तिन्ही विभागांकडून करण्यात येणारी कायदेशीर व दंडात्मक कार्यवाही म्हणजे व्यापारी व दुकानदारांवर दहशत निर्माण करुन आत्महत्येस प्रवृत्त करणारी असल्याचे श्री.जलील हे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देतात. (Open Market, Business Imtiaz Jaleel Demands To Chief Minister)

इम्तियाज जलील
मराठा आरक्षणावरुन चिखल फेक, हर्षवर्धन जाधव यांची टीका

दुकानातील कर्मचाऱ्यांचा पगार, दुकान भाडे, स्वतःचे घर खर्च भागवणे, औषधोपचार खर्च, व्यावसायिक कर्जावरील व्याज त्यातच आता पावसाळा सुरु होतो. त्या दृष्टीने दुकानाची दुरुस्ती, साफसफाई, मालाचे व्यवस्थापन व इतर अत्यावश्यक बाबी करणे अत्यंत गरजेचे आहे. नसता व्यापारी व दुकानदारांचे कोट्यावधी रुपयांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जे छोटे दुकानदार व टपरीधारकांमध्ये सरकार विरोधी भावना निर्माण होत असून त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या दंडात्मक व कायदेशीर कार्यवाही तसेच कुटुंबाचे उदरनिर्वाह करण्याचे संकट निर्माण होत असून त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या दंडात्मक व कायदेशीर कार्यवाही तसेच कुटुंबाचे उदरनिर्वाह करण्याचे संकट निर्माण झाल्याने त्यांच्या मनात आत्महत्या करण्याचे विचार येत असल्याचे अनेक व्यापारी व दुकानदार बांधवांनी बोलून दाखविलेले आहे.

पत्राच्या शेवटी जलील यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील व्यापारी, दुकानदार व टपरीधारक बांधवांचा सहानुभूतीपूर्वक विचार १ जूनपासून सर्व प्रकारचे उद्योगधंदे, बाजारपेठा सुरु करण्याची परवानगी देण्यात यावी. तसेच जिल्हा प्रशासनाच्या तिन्ही पथकामार्फत दुकानांना लावण्यात आलेले सिल काढून व्यवसाय सुरु करण्याची परवानगी देण्याचे आदेश संबंधित अधिकारी व विभाग यांना देऊन सहकार्य करावे, अशी विनंती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.