धाराशिव : शहरातील नगर पालिकेच्या माध्यमातून करण्यात येणारी स्वच्छता व पथदिवे आदी कामेही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्याची उपहासात्मक मागणीचे निवेदन महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. यावेळी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काळे मास्क घालून निषेधही नोंदविला.
जिल्हाधिकारी यांचा उल्लेख पालकमंत्र्यांचे सालगडी असा करून त्यांच्यावर गंभीर आरोप केले. जिल्हाधिकाऱ्यांवरील आरोपांसंदर्भात त्यांच्याशी वारंवार संवाद साधण्याचा प्रयत्न केल्यावरही त्यांच्याकडून प्रतिसाद देण्यास टाळाटाळ केली जात आहे. शहरात नगरपालिकेकडून स्वच्छतेचे काम होते, वर्षभरापासून स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. सहा-सहा महिने नालेसफाई होत नाही, कचरा उचलला जात नाही. कोविडप्रमाणे डेंग्यूसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. याबाबत अनेकदा आंदोलन, निवेदन देऊन सुधारणा झाली नाही.
गणपती, दसरा व दिवाळी सणात ४० टक्के पथदिवे बंद असून नागरिकांना अंधारात चाचपडत जावे लागते. ही हेळसांड थांबवून कार्यान्वित यंत्रणा बदलू नये, अशी मागणी २१ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना केली. तरीही त्यादिवशी पालकमंत्री व सत्ताधारी आमदार यांच्या दबावाखाली येऊन मार्चमध्ये प्रशासकीय मंजुरी दिलेल्या कामांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केले. दहा लाखाच्या आतील कामे ई निविदा करणे बंधनकारक राहिले, असे जिल्हाधिकारी आदेश देतात व पुन्हा त्यांच्याच आदेशाने कामे शिफारशीवरून होतात.
जिल्हाधिकारी यांची भूमिका अत्यंत एकतर्फी असून त्यांच्याकडून असा प्रकार झाल्याने शेवटी नगरपालिकेची राहिलेली कामे सुद्धा बांधकाम विभागाला वर्ग करा, असे आम्ही म्हटले आहे. पालकमंत्री सांगणार व हे ऐकणार असं कसं चालेल? तुम्ही जनतेच्या हितासाठी तिथे बसला आहात की सत्ताधाऱ्याचे भले करण्यासाठी आला आहात.
- अमित शिंदे, माजी नगराध्यक्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.