औरंगाबादमध्ये कोरोनाने चारशेहून अधिक बालकांचे छत्र हरवले

दोन्ही पालक गमावलेल्या जिल्ह्यातील १५ पाल्यांच्या नावाने शासन निर्णयानुसार पाच लाख रुपयांची रक्कम बँकेत ठेवण्याबाबतची कार्यवाही करावी
orphan
orphanorphan
Updated on

औरंगाबाद: कोरोना महामारीने जिल्ह्यातील ४०२ बालकांना आई-वडील यापैकी एक किंवा दोन्ही पालक गमावावे लागले तर २२० महिलांच्या नशिबी वैधव्य आले. दोन्ही पालक गमावलेल्या जिल्ह्यातील १५ पाल्यांच्या नावाने शासन निर्णयानुसार पाच लाख रुपयांची रक्कम बँकेत ठेवण्याबाबतची कार्यवाही करावी. तसेच आवश्यक ते सहाय्य उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत.

महिला व बाल कल्याण विकास अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा कृती दलाची मंगळवारी (ता.२९) जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. महिला व बालविकासचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नागेश पुंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहूल, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी महादेव डोंगरे, रेश्मा चिमंद्रे, प्रमोद येडोले यांच्यासह समिती सदस्य ॲड. अनिता शिवूरकर, ॲड. रेणुका घुले, ॲड. विवेक कुलकर्णी उपस्थित होते.

orphan
SEBI ने केले महत्त्वाचे बदल; गुंतवणुकदारांसाठी नवीन नियम

जिल्हाधिकाऱ्यांनी एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या ४०२ पाल्यांच्या प्रस्तावांवर लवकरात लवकर आवश्यक कार्यवाही करावे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात बाल कल्याण समितीने बैठक घेऊन या पाल्यांना बालसंगोपन किंवा बालगृहात ठेवण्याच्या अनुषंगाने प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देशित केले. दोन्ही पालक गमावलेल्या जिल्ह्यातील १५ पाल्यांच्या नावाने शासन निर्णयानुसार ५ लाख रुपयांची रक्कम बँकेत ठेवण्याची कार्यवाही पूर्ण करावी. ४०५ मुलांची तालुकानिहाय यादी करुन संबंधित आमदारांना पाठवावी. पात्र पाल्यांना अनाथ प्रमाणपत्र द्या, कोरोनामुळे वैधव्य आलेल्यांच्या मदतीसाठी माहिती संकलन प्रक्रिया गतिमानतेने पूर्ण करुन प्रस्ताव पुढील कार्यवाहीस्तव सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

orphan
Corona Update: औरंगाबादकरांची काळजी वाढली! रुग्णसंख्येत पुन्हा वाढ

पंधरा बालके झाली पोरकी-
एक पालक गमावलेल्या ३८७ आणि दोन्ही पालक गमावलेल्या १५ अशा एकूण ४०२ पाल्यांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू आहे. कोरोनामुळे विधवा झालेल्यांची संख्या २२० असून त्यापैकी ९४ महिलांची माहिती संकलित करण्यात आली आहे. संबंधित विभागाकडे प्रस्ताव सादर करण्याची कार्यवाही सुरू असून तसेच जिल्ह्यातील एकूण कार्यरत २१ बालगृहातील कर्मचाऱ्यांची लसीकरण प्रक्रिया सुरु असल्याची माहिती श्री. पुंगळे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.