ईदचा आनंदोत्सव असतानाही, केले कोरोनाबाधित व्यक्तीवर अंत्यसंस्कार

श्री. जाफरी, जावेद शेख, आयाज पटेल, खाशीम शेख, मोईन गवंडी यांनी कोविड नियमावलीनुसार महिलेवर अंत्यसंस्कार केले.
उमरगा (जि.उस्मानाबाद) :  तालुक्यातील मानेगोपाळ येथे कोरोनाबाधित महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
उमरगा (जि.उस्मानाबाद) : तालुक्यातील मानेगोपाळ येथे कोरोनाबाधित महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Updated on

उमरगा (जि.उस्मानाबाद) : तालुक्यातील (Umarga) मानेगोपाळ येथील एका ४५ वर्षीय कोरोना संक्रमण (Corona) झालेल्या महिलेचा उपजिल्हा रुग्णालयात शुक्रवारी (ता.१४) मृत्यु झाला. नातेवाईकांनी गावातील शेतात अंत्यसंस्कार (Cremation) करण्याचा निर्णय घेतला. अंत्यसंस्कार करण्याची विचारणा केल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते बाबा जाफरी व त्यांच्या मित्रमंडळींनी ईद सण असतानाही मृतदेहावर दुपारी बारा वाजता अंत्यसंस्कार केले. श्री. जाफरी, जावेद शेख, आयाज पटेल, खाशीम शेख, मोईन गवंडी यांनी कोविड नियमावलीनुसार महिलेवर अंत्यसंस्कार केले. मानेगोपाळ येथील भिमाशंकर गायकवाड, व्यंकट हिप्परगे, बालाजी हिप्परगे, अमर सोनकांबळे, विलास सोनकांबळे, सिद्धनाथ गुरव आदी तरूणांनीही यासाठी मोलाचे सहकार्य केले. (Osmanabad Latest News In Eid Festival People Completes Cremation On Covid Patient In Umarga)

उमरगा (जि.उस्मानाबाद) :  तालुक्यातील मानेगोपाळ येथे कोरोनाबाधित महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
लसीकरण केंद्रावर अघटित घडल्यास जबाबदार कोण? भाजपचा सवाल

ईदच्या पूर्वसंध्येला आष्टा कासार येथे झाले अंत्यसंस्कार

लोहारा तालुक्यातील आष्टा कासार येथील ६५ वर्षीय नागरिक आठ दिवसांपासून आजारी होता. गुरुवारी (ता.१३) रात्री आठच्या सुमारास तो खोलीत मृतावस्थेत दिसून आला. कोविड संसर्गाचा संशय असल्याने जवळ कोणीही जात नव्हते. सरपंच श्री. सोमवंशी यांनी बाबा जाफरी सोशल फाऊंडेशनशी संपर्क केला. त्यांच्या टीमने पूर्ण दक्षता घेऊन या व्यक्तीचे अंत्यसंस्कार केले, त्यासाठी लागणारे साहित्य सामग्री ग्रामपंचायतीने दिले. विशेष म्हणजे बाबा जाफरी यांनी स्वतः भडाग्नी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()