छत्रपती संभाजीनगर : रब्बी हंगाम २०२३ मध्ये शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या पिकांचे पंचनामेही झाले, पीकविम्यापोटी नुकसानभरपाई देणाऱ्या विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी नुकसानीची पाहणीही केली. .परंतु, वर्ष झाल्यानंतरही दुसऱ्या वर्षीच्या रब्बी हंगामातही तीन जिल्ह्यांतील जवळपास ५० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई न मिळाल्याचे चित्र आहे. मदत न मिळालेल्यांमध्ये छत्रपती संभाजीनगरसह बीड, जालना या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा समावेश आहे.मागीलवर्षी रब्बी पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीची पाहणीही केली होती. परंतु, अद्यापही ५० हजार ९१ शेतकऱ्यांच्या त्रुटींची पूर्तता झाली नसून, या शेतकऱ्यांना जवळपास ११ कोटी ५८ लाख रुपये नुकसानभरपाईपोटी मिळण्याचे बाकी असल्याचे समोर आले आहे. .पीकविम्यापोटी नुकसानभरपाई न मिळालेल्या शेतकऱ्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३८ हजार ८२७ शेतकरी (आठ कोटी ७७ लाख रुपये), जालना जिल्ह्यातील सात हजार ३२६ (दोन कोटी ६४ लाख रुपये), बीड जिल्ह्यातील तीन हजार ९३८ शेतकरी (१७ लाख रुपये) इतक्या शेतकऱ्यांचा समावेश आहे.अपात्र शेतकऱ्यांची का वाढली संख्या?विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, तीन जिल्ह्यांतील ६९ हजार ८०५ शेतकरी हे पीकविमा नुकसानभरपाईसाठी अपात्र ठरले आहेत. यामागची कारणे जाणून घेतली असता, नुकसान झाल्यानंतर ७२ तासांत विमा कंपन्यांना न कळविणे, शेतात एक पीक अन् विमा प्रीमियम दुसऱ्याच पिकांचा भरणे यांसारखे प्रकार समोर आल्याने जवळपास ७० हजारांवर शेतकरी नुकसानभरपाई मिळण्यापासून अपात्र ठरल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे यांनी दिली..गतवर्षीच्या रब्बी हंगामात नुकसान झालेल्या विभागातील जवळपास १३ लाख सात हजारांवर शेतकऱ्यांना ७४ कोटी ४७ लाखांची मदत मिळालेली आहे. असे असले तरी बहुतांश शेतकऱ्यांचे बॅंक खाते आधार लिंक नसणे यांसारख्या कारणांमुळे प्रलंबित राहिले आहेत. लवकरच त्यांच्या खात्यात भरपाईचे अनुदान जमा होईल.- डॉ. तुकाराम मोटे, विभागीय कृषी सहसंचालक, छत्रपती संभाजीनगर.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.