अनर्थ टळला! ऑक्सिजन प्रेशर कमी झाल्याने अचानक आठ रुग्णांना हलविले

औरंगाबादमधील मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमधील प्रकार
oxygen
oxygenoxygen
Updated on

औरंगाबाद: ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे (oxygen shortage) अनेकांना जीव गमवावा लागत आहे. त्यात बुधवारी (ता. १३) रात्री महापालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमध्ये (Meltron covid care center) ऑक्सिजन प्रेशर कमी झाल्याने आठ रुग्णांची प्रकृती चिंताजनक झाली. त्यांना घाटी व अन्य खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, असे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी ऑक्सिजनची मारामार सुरू आहे. शहरातील ऑक्सिजनच्या नियोजनासाठी महापालिका प्रशासकांच्या नेतृत्वाखाली समिती आहे. ऑक्सिजनचा अपव्यय होऊ नये म्हणून समिती काळजी घेत आहे. शहराला रोजच्या गरजेनुसार ऑक्सिजन मिळत असल्याचा दावा प्रशासनातर्फे केला जात आहे. पण महापालिकेच्या मेल्ट्रॉन येथील कोविड केअर सेंटरमध्ये बुधवारी रात्री ऑक्सिजन सिलिंडर दीड तास उशिराने मिळाल्याने रुग्णांचा जीव टांगणीला लागला. याठिकाणी आयसीयूमध्ये १० तर ऑक्सिजनवर ६७ रुग्ण उपचार घेत होते.

oxygen
रमजान ईदला ‘खाकी’ने २२ कुटुंबांच्या चेहऱ्यावर फुलवले समाधान

चानक कोविड सेंटरमधील रुग्णांना दिल्या जाणाऱ्या ऑक्सिजनची पातळी खालावली. हा प्रकार लक्षात येतात डॉक्टरांची धावपळ सुरू झाली. सर्वच रुग्णांना इतरत्र हलवणे शक्य नसल्याने काही गंभीर रुग्णांना इतरत्र हालवल्यास इतर रुग्णांना चांगले प्रेशर मिळेल, या हेतून अधिकाऱ्यांनी निर्णय घेत आठ रुग्णांना घाटीत व काही खासगी रुग्णालयात हलविले. येथील गंभीर रुग्णांना वारंवार घाटी रुग्णालयात पाठवण्यात येते. काल ऑक्सिजन प्रेशर कमी असल्याने काही रुग्ण आणखी गंभीर होऊ नयेत म्हणून त्यांना येथून हलविले. त्यामुळे इतरांना सुरळीत ऑक्सिजन मिळाला. मेल्ट्रॉनमध्ये मुबलक सिलिंडर आहेत पण कधी कधी सिलिंडर येण्यास विलंब होतो, असे डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले.

२५ सिलिंडर उशिरा मिळाले
मेल्‍ट्रॉनसाठी २५ सिलिंडर रात्री उशिरा मिळाले. त्यानंतर पुन्हा गुरुवारी सकाळी सिलिंडर भरून घेण्यात आले होते. ऑक्सिजन सिलिंडरसह येथे ऑक्सिजन कन्संट्रेशन पण उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.