Sambhaji Nagar News : पाचोडचा पशुवैद्यकीय दवाखाना नावालाच

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त
Sambhaji Nagar News : पाचोडचा पशुवैद्यकीय दवाखाना नावालाच
Updated on

पाचोड : गेल्या सहा महिन्यांपासून पाचोड (ता.पैठण) येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्याची जागा रिक्त असल्याने परिसरातील पशुधन संकटात सापडून पशुवैद्यकीय दवाखान्याचे ''नाव मोठे अन् लक्षण खोटे'' अशी अवस्था झाल्याचे चित्र पहावयास मिळते.

पाचोड (ता.पैठण) येथे पशुधनाच्या आरोग्याचा विचार करून जिल्हा परिषेदेतंर्गत येथे पशुवैद्यकीय दवाखान्याची निर्मिती करून ''वर्ग एक''ची पदस्थापना करण्यात आली. या दवाखान्यांतर्गत पाचोडसह परिसरातील विहामांडवा, थेरगाव, दावरवाडी हे ''ब'' (वर्ग दोन)चे पशुदवाखाने व परिसरातील पस्तीसवर गावे संलग्न असून जवळपास २५ हजार पशुधनाच्या आरोग्याची जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र, या ठिकाणी कार्यरत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश श्रीराव हे गेल्या सहा महिन्यापूर्वी निवृत्त झाले. मात्र, शासनाला या ठिकाणची रिक्त जागा भरण्याचा विसर पडला असून तेव्हापासून या पदासोबतच अन् व्रणोपचार कर्मचाऱ्यांची पदेही रिक्त असल्याने पशुधन संकटात सापडले आहेत.

Sambhaji Nagar News : पाचोडचा पशुवैद्यकीय दवाखाना नावालाच
Sambhaji Nagar News : अवकाळीच्या संकाटानंतर रब्बी पेरणीला आला वेग

यासोबतच दावरवाडी, थेरगाव, बिडकीन आदी ठिकाणी पात्रताहिन कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या नियुक्त्या करून पशुपालकांच्या जखमेवर राज्यसरकारने मीठ चोळले आहे. नियुक्त कंत्राटी कर्मचारी वर्ग एकच्या अधिकाऱ्यापेक्षाही रुबाब गाजवून आठवड्यातून कधीतरी हजेरी लावून पगाराचे मालक बनले आहेत. या पशुवैद्यकीय दवाखान्यांबाबत वरिष्ठांचे कोणतेच अंकुश नसल्याने पशुधन संकटात सापडून पशुपालक मेटाकुटीला आला आहे. पाचोड परिसरात शेतकरी शेतीपूरक व्यवसाय म्हणून म्हैस, गो व शेळीपालनातून दुग्धव्यवसाय करतात. मात्र, त्यांच्या जनावरांना आरोग्यसेवा मिळत नसल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

जनावरे लाल्या, खुरकूत, घटसर्प, लम्पी अशा विविध आजाराने ग्रस्त होऊनही सहा महिन्यापासून उपचारापासून वंचित आहेत. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी पशुधनाची परवड होत आहे. आता जनावरांवर खासगी व्यक्तींकडून उपचार करावे लागत आहे."

--विकास डवणे (पशुपालक, मुरमा)

Sambhaji Nagar News : पाचोडचा पशुवैद्यकीय दवाखाना नावालाच
Sambhaji Nagar News : बहीण-भावाच्या मृत्यूप्रकरणी आरोपींना न्यायालयीन कोठडी

जनावरे लाल्या, खुरकूत, घटसर्प, लम्पी अशा विविध आजाराने ग्रस्त होऊनही सहा महिन्यापासून उपचारापासून वंचित आहेत. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी पशुधनाची परवड होत आहे. आता जनावरांवर खासगी व्यक्तींकडून उपचार करावे लागत आहे."

--विकास डवणे (पशुपालक, मुरमा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.