पैठण : ट्रक, आयशर अपघातात एक जण ठार

पैठण-पाचोड मार्गावरील आखतवाडा फाट्याजवळील जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याच्या वळण रस्त्यावर घडली.
ट्रक, आयशर अपघातात एक जण ठार
ट्रक, आयशर अपघातात एक जण ठारsakal
Updated on

पैठण : ट्रक व आयशर यांच्यात झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता.२७) दुपारी ४.३० वाजता पैठण-पाचोड मार्गावरील आखतवाडा फाट्याजवळील जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याच्या वळण रस्त्यावर घडली. याप्रकरणी पैठण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मोहनलाल मिश्रीलाल फुलवारी (वय ३२ रा.भारत नगर, गांधीधाम जि. कच्छ) असे मृत्युमुखी पडलेल्या आयशर चालकाचे नाव आहे. तर राजेंद्र रावसाहेब सुळ (वय २३, रा.खेड ता. कर्जत जि.अहमदनगर) असे गंभीर जखमी ट्रक चालकाचे नाव असून त्यांच्यावर रुग्‍णालयात उपचार सुरु आहे.

ट्रक, आयशर अपघातात एक जण ठार
औरंगाबाद : शहरात वाढणार २० नगरसेवक

याबाबत पोलिसांनी सांगितले की, बुधवारी (ता.२७) दुपारी साडेचारच्या सुमारास पैठण-पाचोड मार्गावरील आखतवाडा फाट्याजवळील जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याच्या वळण रस्त्यावर ट्रक (क्र.एम.एच-१६-सीसी ९९२१) आणि आयशर (क्र-जीजे १२ बी. वाय. ०१७८) या दोन वाहनांची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, त्यात आयशरच्या केबिनचा भाग चक्काचूर झाला. तर ट्रक बाजूच्या शेतात जाऊन उलटला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक किशोर पवार, फौजदार रामकृष्ण सागडे, गटकुळ, पोलिस कॉन्स्टेबल एडके, चेडे, दुल्लत यांनी घटनास्थळी धाव घेतली व मृत चालक यांचा मृतदेह बाजूला काढून घटनेचा पंचनामा केला तर ट्रकचा जखमी चालक यास पैठण येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पैठण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

ट्रक, आयशर अपघातात एक जण ठार
सातारा : 'ठोसेघरला वाघाबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका'

मदतीसाठी धावले नागरिक

दरम्यान, हा भीषण अपघात पाहून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली. यानंतर ठार झालेल्या चालकाचा मृतदेह काढण्यासाठी व जखमी चालकाला रुग्णालयात तातडीने हलविण्यासाठी पुढाकार घेतला. यानंतर पोलिसांनाही घटनास्थळी धाव पंचनामा केला, अशी माहिती निरीक्षक किशोर पवार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.