पैठण : बाहेरहून कडीकोयंडे लावून गाव लुटीचा चोरट्यांचा प्रयत्न फसला

मात्र वाघमारे कुटुंबियांचा रोख रकमेसह साडेसात लाखांचा ऐवज लांबविला
बाहेरहून कडीकोयंडे लावून गाव लुटीचा चोरट्यांचा प्रयत्न फसला
बाहेरहून कडीकोयंडे लावून गाव लुटीचा चोरट्यांचा प्रयत्न फसलाSakal
Updated on

पाचोड : अवघे गाव गाढ झोपेत असतांना चोरट्यांनी अनेक घरांचे बाहेरहून कडीकोयंडे लावुन नियोजनबद्ध गाव लुटीचे नियोजन आखले,मात्र चोरटे केवळ एकाच घरात धाडसी जबरी चोरी करुन पावणेदोन लाखाच्या रोकडसह साडेसात लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेण्यात यशस्वी झाल्याची घटना वडजी (ता.पैठण) येथे शनिवारी (ता.१२) मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडली.
अधिक माहीती अशी, वडजी (ता.पैठण) हे अडीचशे उंबऱ्याचे गाव अलिकडे मोसंबी, भाजीपाला व डाळिंबाच्या बागांमुळे सधन झाले असुन गावांत अनेक छोटे -मोठे कापसाचे व्यापारी उदयाला आले. गावांत दररोज मोठया प्रमाणावर उलाढाल होत असल्याचे लक्षात घेऊन अज्ञात चोरटयांनी शुक्रवारी (ता.११) व्यवहारावर पाळत ठेवून गाव लुटीचेच नियोजन आखून शनिवारी (ता.१२) मध्यरात्री दीड -दोन वाजेच्या सुमारास चोरटयांनी थेरगाव - विहामांडवा रस्त्यावरील वडजी गावाला लक्ष्य केले, मात्र रोख रकमेसह साडेसात लाखांच्या ऐवजावर त्यांना समाधान मानावे लागले.

बाहेरहून कडीकोयंडे लावून गाव लुटीचा चोरट्यांचा प्रयत्न फसला
''मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या वारसांना नोकरी''

अज्ञात चोरट्यांनी वडजी गावांत प्रवेश करून ग्रामस्थ गाढ झोपेत असल्याचे पाहुन मुख्य रस्त्यावरील महत्त्वाच्या पंधरा विस घरांच्या बाहेरुन कडया लावुन ग्रामस्थाना घरांत कोंडून टाकत वाघमारे कुटुंबियांना सर्वप्रथम लक्ष्य केले, मात्र मोबाईलमुळे चोरट्यांचे गावलुटीचा डाव उधळला गेला. वडजी येथील सखाराम दामोधर वाघमारे हे दिवसभराचे काम आटोपून त्यांच्या पत्नीसह अशोक व विकास या मुलासोबत नवीन बांधलेल्या घरांत झोपी गेले. ते गाढ झोपेत असतांना चोरटयांनी घरा समोरील दिवे बंद करून चॅनेल गेटमधून आंत प्रवेश मिळविला व सखाराम व त्यांच्या मुलाच्या खोल्याचे बाहेरून कोयंडे लावून सर्व लाईट बंद करून एकेक खोलीतील सामानाची धुडाळणी सुरू केली.

सर्वप्रथम चोरटयांनी लोखंडी पेटया घरामागील कापसाच्या शेतात नेऊन त्यातील साहित्याची तपासणी केली.यांत ठेवलेले सर्व कुटुंबियाचे, सासरी नांदावयास गेलेल्या मुलींचे सोन्याचे गंठण, पोती, मणी, कर्णफुले, झुंबर, एकदाणी आदी साडेबारा तोळ्याचे दागिने तर पन्नास हजारावर चांदीचे दागिने, रोख पावणेदोन लाख रुपये चोरट्यानी काढुन घेतले. घरांत आणखी काही असेन म्हणुन पुन्हा ते घराची झडती घेत असताना सखाराम यांना खडखड आवाज ऐकू आला असता ते झोपेतुन उठले व त्यांनी दुसऱ्या खोलीत जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांना बाहेरून दरवाजा बंद केल्याचे दिसून आले, लाईटही बंद असल्याने पाहुन त्यांना चोरट्यांचा संशय आला. त्यांनी दरवाजाला कान लावून कानोसा घेतला असता चोरटे घराची धुंडाळणी घेत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

त्यांनी उशाला ठेवलेला आपला मोबाईल घेऊन शेजाऱ्यांशी संपर्क केला, मात्र त्यांचे दरवाजाचे बाहेरून कोयंडे लावल्याने ते येऊ शकले नाही, त्यानंतर गावांत अन्य लोकांना मोबाईल केला,त्यातही वीस - पंचवीस जणाचे बाहेरून कड्या लावल्याने ते उठले परंतु मदतीसाठी येऊ शकले नाही. सखाराम यांनी आपल्याकडील बॅटरी चमकावली असता चोरटयांनी घरांतून कापसाच्या पिकांत पळ काढला. चोरटे आल्याचे एकमेकांना फोनवरून कल्पना दिल्याने अवघे गाव झोपेतुन जागे झाले. सर्वानी दरवाजे कडया उघडून वाघमारे कुटुंबियाच्या घराकडे गर्दी केली. चोरटयांनी मिळालेल्या वाघमारेंच्या ऐवजावरच समाधान मानुन घटनास्थळाहून शेताच्या दिशेन पोबारा केला.
सरपंच भाऊसाहेब गोजरे, पोलिस पाटील विठ्ठल झिणे, महेश झरकर, कैलास भांड आदीनी या घटनेची पाचोडपोलिसांना माहीती दिली, ही माहीती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यानी सहकाऱ्या समवेत घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. व औरंगाबादहुन श्वान व अंगुलामुद्रा तज्ञाच्या पथकाला पाचारण केले.त्यानंतर पैठणचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल नेहुल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. श्वानपथकाने 'माघ' शोधण्याच्या प्रयत्न केला, मात्र गावांलगतच्या नदीपर्यंत श्वान जाऊन तेथेच घुटमळले. कापसाच्या पिकांत अस्ताव्यस्त पडलेल्या लोखंडी पेटया, कपडे, अन्य सखाराम वाघमारे यांचे घरातील साहीत्य सापडून आले. एकंदरीत या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून चोरटयांची दहशत पसरली आहे.

बाहेरहून कडीकोयंडे लावून गाव लुटीचा चोरट्यांचा प्रयत्न फसला
पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची आय.टी. कंपन्या मध्ये निवड : शिरकांडे

सखाराम वाघमारे यांच्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्याविरूध्द पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी करीत आहेत.
सरपंच भाऊसाहेब गोजरे यांनी पोलीसांची रात्रीला गस्त सुरु करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.