Latur News : बाबासाहेबांच्या पवित्र अस्थी असलेले पानगाव

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी जमतात लाखो अनुयायी
latur,pangaon
latur,pangaonsakal
Updated on

रेणापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थी असलेले ठिकाण म्हणजे रेणापूर तालुक्यातील पानगाव आहे. दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त ता.सहा डिसेंबरला येथे अभिवादन करण्यासाठी लाखो आंबेडकरी अनुयायी जमतात.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ता. ६ डिसेंबर १९५६ ला महापरिनिर्वाण झाले. आंबेडकरी अनुयांयीसह सारा देश शोकसागरात बुडाला. बाबासाहेबांच्या महानिर्वाणाची बातमी आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात आली.

तेव्हा लातूर जिल्ह्यातील पानगाव येथील ग्यानबा आचार्य (शिंगाडे) यांना गावात रात्री राघोपंत कुलकर्णी यांनी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाची माहिती दिली. त्यानंतर ग्यानबा हे रडत-रडतच आपल्या वस्तीवर आले. तेथे त्यांनी ही माहिती दिली. त्यावर वस्तीवरचे सगळेजण धावतच राघोपंत यांच्या घरी गेले. ही माहिती खरी असल्याचे समजताच वस्तीत प्रत्येक घरातील लहान-थोर रडू लागले. जमलेल्या पैकी लिंबाजी आचार्य यांनी मी मुंबईला जाऊन बाबासाहेबांचे अंतिम दर्शन घेणार असल्याचे सांगितले.

latur,pangaon
Latur News : लुटमारीच्या तयारीतील चौघे गजाआड

तेव्हा तिथे असलेले दगडू आचार्य, प्रभाकर आचार्य, किशन आचार्य, वैजनाथ आचार्य, सूर्यभान आचार्य, यादव आचार्य यांनीही मुंबईला येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर हे सर्वजण मुंबईकडे निघाले. तेव्हा पानगावहून लातूरला जाण्यासाठी कसलीही सोय नव्हती, तरीही रात्री १० वाजेच्या सुमारास ते पायीच १२ ते १२.३० वाजता लातूरच्या रेल्वे स्थानकावर पोहचले. लातूरहून सकाळी कुर्डूवाडीपर्यंत रेल्वे असल्याचे समजले. तेव्हा सर्वांनी फलाटावर बसूनच रात्र काढली.

latur,pangaon
Latur Rain News : पानचिंचोली मंडळाला अवकाळी पावसाने झोडपले; पिकांचे नुकसान

सकाळी रेल्वेने कुर्डूवाडी-पुणे-मुंबई प्रवास करत दादर गाठले. जिथे बाबासाहेबांवर अंत्यसंस्कार झाले होते, तेथे जाऊन अखेरचे दर्शन घ्यावे म्हणून सर्वजण निघाले. अंत्यसंस्कार स्थळी राख होती. तेव्हा त्याच राखेचा टिळा लावून ही सारी मंडळी नतमस्तक झाली. दरम्यान, उठताना लिंबाजी आचार्य यांनी सर्वांच्या नकळत मुठभर अस्थींची राख घेतली. ती खिशात घालून ते तिथून निघाले. दादरच्या रेल्वेस्थानकावर आल्यावर लिंबाजीने सोबत असणाऱ्यांना अस्थी आणल्याचे सांगितले.आता या अस्थींचे काय करायचे म्हणून सर्वजण विचार करू लागले. विचारांअंती त्या अस्थी पानगावला आणल्या. गावात अस्थी आणल्यानंतर सर्वांच्या उपस्थितीत बुद्ध वंदना घेण्यात आली.अस्थिकलश सार्वजनिक जागेत सुरक्षित पुरून ठेवण्यात आला.

तेव्हापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थी कलशाला अभिवादन करण्याकरिता दर सहा डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनी मराठवाड्यासह सीमावर्ती आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक भागातून लाखों आंबेडकरी अनुयायी येतात. बाबासाहेबांचे १९५६ पासुन चैत्य (अस्थी) असलेली जागा पवित्र मानली जाते. त्यामुळे पानगाव हे आंबेडकरी अनुयायांचे शक्ती केंद्र म्हणून ओळखले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.