Pankaja Munde : पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याची उत्सुकता, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाषणाकडे लक्ष

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांच्या पहिल्या दसरा मेळाव्यात काय बोलणार हे सर्वांचं लक्ष लागलं आहे. १० वर्षांच्या कालावधीनंतर भाजपच्या मुख्य प्रवाहात परतलेल्या मुंडे यांची सभा श्री क्षेत्र सावरगाव घाट येथे १२ ऑक्टोबर रोजी होत आहे.
Pankaja Munde
Pankaja Mundesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : जवळपास १० वर्षांच्या कालावधीनंतर भाजपच्या मुख्य प्रवाहात सक्रिय झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचा पहिलाच दसरा मेळावा शनिवारी (ता.१२) श्री क्षेत्र सावरगाव घाट येथे होत आहे. यापूर्वीच्या मेळाव्यांत पंकजा मुंडे यांनी वारंवार परखड आणि स्पष्ट विधाने केल्याने आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्या यंदाच्या मेळाव्यात काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

श्रीक्षेत्र सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांच्या वतीने दरवर्षी दसरा मेळावा आयोजित केला जातो. या मेळाव्याच्या निमित्ताने अनेकदा राजकीय भूमिकांचे सूतोवाचही केले जाते. मध्यंतरी जवळपास १० वर्षे भाजपच्या राज्यातील मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या मुंडे यांनी या मेळाव्यांमध्ये आक्रमक विधाने करून खळबळ उडवून दिली होती.

जवळपास दशकभराच्या विजनवास संपवून पंकजा मुंडे आता विधानपरिषदेत पोचल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात केवळ पंकजा यांचाच नाही तर महायुतीच्या इतर उमेदवारांचाही पराभव झाला.

त्यात येत्या महिनाभरात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. याठिकाणी भाजपसह इतर कुठल्या पक्षाचे नेते हजेरी लावतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.