औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाच्या BJP राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना झटका बसला आहे. पंकजा यांचा परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे (Vaidyanath Co-operative Sugar Factory) बँक खाते सील करण्यात आले आहे. ही कारवाई औरंगाबादच्या Aurangabad कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) (EPFO) केली आहे. ही मोठी कारवाई आहे. सदरील कारखान्याच्या पंकजा मुंडे या अध्यक्षा आहेत. भविष्य निर्वाह निधीचे (पीएफ) एक कोटी ४६ लाख रुपये थकल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. पांगरी (ता.परळी) येथील वैद्यनाथ कारखान्याचे बँक खाते ईपीएफओने सील केले आहे. जवळपास ९२ लाख रुपयांची थकबाकी वसुल करण्यात आली आहे. pankaja munde's sugar factory bank account sealed by epfo aurangabad glp88
ही कारवाई सहायक आयुक्त आदित्य तलवारे यांच्या आदेशावरुन प्रवर्तन अधिकारी सुधीर वानखेडे यांनी केले आहे. वैद्यनाथ कारखान्याकडे कर्मचाऱ्यांची १.४६ कोटी रुपयांची भविष्य निर्वाह निधी थकीत होता. कामगारांचे १९ महिन्यांचे पगारच न मिळाल्याने त्यांनी मार्चमध्ये कारखाना बंद केला होता. जोपर्यंत पगार मिळत नाही, तोपर्यंत कारखाना सुरु करु देणार नसल्याची भूमिका कामगारांनी घेतली होती. दरम्यान ५६ लाखांच्या वसुलीसाठी कार्यवाही सुरु असल्याचे ईपीएफओ कार्यालयाने कळविले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.