मानवत: तालुक्यात ग्रामीण भागातील घरगुती विद्युत ग्राहकांकडून थकित विज बिल वसुलीची मोहीम विद्युत वितरण कंपनीने सुरू केली आहे. वीज बिल वसूल करण्यासाठी तालुक्यातील एकूण १३ गावांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. सध्या दहावी -बारावीची परीक्षा सुरू असून खंडित वीज पुरवठ्यामुळे विद्यार्थी हतबल झाले आहेत. सोबतच विद्युत पुरवठ्याअभावी ग्रामस्थांचे हाल होत आहेत.
तालुक्यात ४९ गावात एकूण ७ हजार घरगुती विद्युत ग्राहक आहेत. या ग्राहकांकडे विजबिलाचे लाखो रुपये थकले आहेत.यामुळे विद्युत वितरण कंपनी कडून वीजबिल वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमे अंतर्गत ग्राहकांनी एकूण थकित विजबिलापैकी ७ हजार २०० रुपये थकबाकी भरण्याचे आवाहन केले जात आहे. परंतु या आवाहनाला ग्रामस्थ प्रतिसाद देत नसल्याने विद्युत वितरण कंपनीकडून गावांचा विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे.
तालुक्यातील एकूण १३ गावांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहे. ऐन परीक्षेच्या काळात विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे विद्यार्थी हतबल झाले आहेत.
यासोबतच सध्या तापमानात वाढ झाल्याने उन्हाचे चटके बसू लागले आहेत. ग्रामस्थांचे पाणीपुरवठा, दळण, अन्य वर्गाचे ऑनलाइन शिक्षण, मोबाईल आदी बाबत गैरसोय होऊ लागले आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षा पार पडेपर्यंत विद्युत वितरण कंपनीची मोहीम थांबवण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.
ही गावे बुडाली अंधारात
कोल्हा उपविभागातील आंबेगाव, इटाळी, गोगलगाव, सावळी, ताडबोरगाव, सोनुळा, रत्नापूर या सहा गावाच्या विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. तर रामपुरी उपविभागातील बोंदरवाडी, लोहरा, मांडेवडगाव, थार, वांगी, कुंभारी व हमदापूर या सात गावांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. यात थार हे गाव ७ फेब्रुवारी तर आंबेगाव १७ फेब्रुवारीपासून अंधारात आहेत. अन्य गावांचा विद्युत पुरवठा फेब्रुवारी अखेरीस व मार्चच्या पहिल्या आठवड्यात खंडित करण्यात आलेला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.