Chhatrapati Sambhajinagar : बालिकेवर शाळेतच अत्याचार झाल्याची पालकांची तक्रार; शिक्षिका म्हणते...

ज्युनिअर केजीमध्ये शिकणाऱ्या साडेतीन वर्षाच्या मुलीवर एकाने लैंगिक अत्याचार केला तर शिक्षिकेने त्याला मदत केल्याची तक्रार दाखल
Parents complain girl abused at school teacher statement to police chhatrapati sambhajinagar
Parents complain girl abused at school teacher statement to police chhatrapati sambhajinagar sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : ज्युनिअर केजीमध्ये शिकणाऱ्या साडेतीन वर्षाच्या मुलीवर एकाने लैंगिक अत्याचार केला तर शिक्षिकेने त्याला मदत केल्याची तक्रार दाखल करण्यात आली. यावरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात अत्याचार, पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी शिक्षिकेला पोलिसांनी ताब्यात घेतले तर अमोल नावाच्या व्यक्तीचा शोध सुरु केला आहे.

मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, शहरातील एका शाळेत ज्युनिअर केजीमध्ये ३ वर्ष ८ महिने वयाची तिची मुलगी जून २०२३ पासून शिकते. मागील वीस दिवसांपासून तिला त्रास होत असल्याने आईने तिला गारखेडा भागातील एका रुग्णालयात दाखविले. तेव्हा तिच्या गुप्तांगाजवळ जखम असल्याचे निदर्शनास आले.

Parents complain girl abused at school teacher statement to police chhatrapati sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar : महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता; विभागप्रमुखांच्या अहवालानंतर कारवाई

विचारपूस केली तेव्हा तिने सांगितले, की अमोल नावाचा व्यक्ती तिच्या गुप्तांगामध्ये पेन्सिल फिरवतो तर वर्गशिक्षिका तिला मारहाण करते आणि अमोलसोबत एका रूममध्ये लॉक करून ठेवते. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून ३० वर्षीय शिक्षिका आणि अमोलविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात लैंगिक अत्याचाराच्या कलमासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपनिरीक्षक मेघा माळी या करत आहेत.

Parents complain girl abused at school teacher statement to police chhatrapati sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar : दहशत माजविणाऱ्या टोळीची पुंडलिकनगर परिसरात धिंड

शिक्षिका म्हणते...

शिक्षिकेची पोलिसांनी चौकशी केली तेव्हा, ‘मी मुलांना कधीही मारहाण करत नाही. त्यामुळे असा प्रकार घडलेला नाही. विशेष म्हणजे, शाळेत पुरुष कोणीही नाहीत आणि अमोल नावाचा केवळ छोटा तीन वर्षांचा एक मुलगा आहे. तर उर्वरित सर्व महिला शिक्षिका आहेत,’’ असे शिक्षिकेने पोलिसांना सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.