समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. मध्यरात्री समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २० जण जखमी आहेत.
मिनी बस आणि ट्रकमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातात बसचा ड्रायव्हर थोडक्यात बचावला आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातातील मृतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांनी यासंबधी पोस्ट सोशल मिडीयावर शेअर केली आहे.
तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या अपघाताने दु:ख झालं. आपले नातेवाईक गमावलेल्यांसोबत मी आहे. लवकरात लवकर जखमी झाले व्यक्ती बरे व्हावेत, अशी इच्छा आहे. मृतांच्या नातेवाईकांना PMNRF कडून २ लाखांची मदत देण्यात येईल तर जखमींना ५० हजारांची मदत दिली जाईल. ही मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे.
समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. ट्रॅव्हल्स बसमधील सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील आहे. या ट्रॅव्हल्स बसमध्ये एकूण 30 प्रवासी होते. हे सर्वजण बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्गाचे दर्शन करून पुन्हा नाशिककडे परत निघाले होते. ज्यात काही लहान मुलांचा देखील समावेश होता. तर, अपघातात 12 जणांचा मुत्यु झाला असून, ज्यात लहान मुलांचा देखील समावेश आहे. तसेच काही महिला देखील आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.