Police Bharti : जागा ७४४; उमेदवार ९७ हजार;पोलिस भरती : दोन पदांच्या चाचण्यांसाठी एकच तारीख असेल तर सूट

जिल्ह्यात पोलिस भरतीसाठी बुधवारपासून (ता. १९) मैदानी चाचणी होणार आहे. छत्रपती संभाजीनगरात शहर पोलिस शिपाई २१२, कारागृह शिपाई ३१५, ग्रामीण पोलिस शिपाई १२६, ग्रामीण चालक शिपाई २१ आणि रेल्वे पोलिस शिपाई ८० जागांसाठी भरतीप्रक्रिया राबविली जात आहे, अशी माहिती प्रभारी पोलिस आयुक्त संदीप पाटील, पोलिस अधीक्षक (ग्रामीण) मनीष कलवानिया आणि पोलिस अधीक्षक (रेल्वे) स्वाती भोर यांनी दिली
Police Bharti
Police Bharti sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात पोलिस भरतीसाठी बुधवारपासून (ता. १९) मैदानी चाचणी होणार आहे. छत्रपती संभाजीनगरात शहर पोलिस शिपाई २१२, कारागृह शिपाई ३१५, ग्रामीण पोलिस शिपाई १२६, ग्रामीण चालक शिपाई २१ आणि रेल्वे पोलिस शिपाई ८० जागांसाठी भरतीप्रक्रिया राबविली जात आहे, अशी माहिती प्रभारी पोलिस आयुक्त संदीप पाटील, पोलिस अधीक्षक (ग्रामीण) मनीष कलवानिया आणि पोलिस अधीक्षक (रेल्वे) स्वाती भोर यांनी दिली. या एकूण ७४४ पदांसाठी ९७ हजार ८२० अर्ज आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्तालय, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण व रेल्वे विभागाने संयुक्तरीत्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत भरतीसंदर्भाने माहिती देण्यात आली. छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्तालयातील २१२ अंमलदार व कारागृहातील ३१५ पोलिस अंमलदारांच्या पदांसाठी होणाऱ्या भरतीसाठी अनुक्रमे १६ हजार १३३ व ७० हजार ३३३, असे एकत्रित ८६ हजार ४६६ अर्ज आले.

विभागीय क्रीडा संकुलावर चाचणी होणार असल्याची माहिती प्रभारी पोलिस आयुक्त पाटील यांनी दिली. ग्रामीण पोलिस विभागातील १२६ व २१ अशा अनुक्रमे अंमलदार व चालकपदांसाठी भरती होणार आहे. त्यासाठी अनुक्रमे ४ हजार ४१८ व २ हजार ७२२ अर्ज आल्याचे पोलिस अधीक्षक (ग्रामीण) कलवानिया यांनी सांगितले. रेल्वे विभागातील ८० पदांसाठी ३ हजार ४६६ पुरुष व ७६५ महिला उमेदवारांचे मिळून ४ हजार २२९ अर्ज आले आहेत. राज्य राखीव पोलिस बलाच्या गट क्रमांक १४ येथे ८ ते ११ जुलैदरम्यान भरतीप्रक्रिया होणार असून, शेवटच्या दिवशी महिला उमेदवारांची चाचणी होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक (रेल्वे) भोर यांनी दिली.

पावसाचा व्यत्यय आला तर?

मैदानी चाचणीसाठी पावसाचा व्यत्यय आला, तर त्या संबंधित उमेदवारांना पुढील आठ-पंधरा दिवसांच्या कालावधीतील तारीख देण्यात येईल. मात्र, त्यासाठी चाचणीशी संबंधित नोंदणीची कागदपत्रे त्याने स्वत:जवळ ठेवणे आवश्यक आहे. १९ ते २२ जूनपर्यंत अंमलदारपदांच्या उमेदवारांची, तर २४ ते २६ चालकपदाची चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीसाठी ५० गुणांची परीक्षा होणार असून, त्यामध्ये ५० टक्के गुण मिळविणारे पात्र ठरतील.

लेखी परीक्षा कधी होणार?

लेखी परीक्षा साधारण २८ जूननंतरच सुरू होईल. १०० गुणांची लेखी परीक्षा राहणार आहे. दोन पदांच्या चाचण्यांसाठी एकच तारीख आलेली असेल, तर उमेदवारांना सूट देण्यात येईल. पाणी, अल्पोपाहार, वैद्यकीयव्यवस्थाही उमेदवारांसाठी राहणार आहे.

मैदानी चाचणी कुठे होणार ?

ग्रामीण पोलिस विभागाची मैदानी चाचणी मुख्यालयामागील मुकुल मैदानात होणार आहे; तसेच सोळाशे व आठशे मीटर धावण्याची चाचणी शेंद्रा एमआयडीसीत होणार आहे. तेथे उमेदवारांना नेले व आणले जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक कलवानिया यांनी सांगितले.

भरतीप्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने होणार आहे. भरतीप्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे कळताच काही बाह्य यंत्रणा कामाला लागतात. त्यांच्याकडून उमेदवारांना वेगवेगळी आमिषे दाखविण्यात येतात. या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, अशा फसवणूक करणाऱ्यांवर पाळत ठेवण्यासाठी स्वतंत्र पथके निर्माण करण्यात आली आहेत.

  • — संदीप पाटील, प्रभारी पोलिस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर शहर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.