Aurangabad : धुळे-सोलापूर महामार्गावर कंटेनरच्या धडकेत पोलिस पाटलाचा मृत्यू

मृतदेह शवविच्छेदनासाठी आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्याने शवविच्छेदन करण्यास नकार दिला. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता.
Aurangabad Accident News
Aurangabad Accident Newsesakal
Updated on

चित्तेपिंपळगाव (जि.औरंगाबाद) : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पांढरी पिंपळगाव परिसरात स्कुटीला कंटेनर वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी (ता.३१ ) धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पांढरी-पिंपळगाव शिवारात दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. नारायण पंडितराव राऊत (वय ७०, रा.हर्षी खुर्द ता.पैठण) असे अपघातात मृत्यू झालेल्या पोलिस पाटलाचे नाव आहे. या अपघाताविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पैठण (Paithan) तालुक्यातील हर्षी खुर्द येथील पोलिस पाटील नारायण राऊत हे त्यांच्या औरंगाबाद (Aurangabad) शहरामध्ये राहत असलेल्या घरी पत्नी व मुलाला भेटण्यासाठी घरून हर्षीहुन (आडूळ मार्गे) औरंगाबादकडे एकटेच आपल्या स्कूटीने (एमएच २० ईक्यु ५४०४ ) जात असताना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पांढरी-पिंपळगाव शिवारात बीडहुन औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कंटेनर वाहनाने ( एचआर ३८ एबी ९४७७ ) त्यांच्या स्कूटी दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली.(Police Patil Died In Accident On Dhule-Solapur Highway In Aurangabad)

Aurangabad Accident News
उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालकपदी बापूराव पाटील यांची बिनविरोध निवड !

हा अपघात एवढा भीषण होता की राऊत हे कंटेनरच्या धडकेत चिरडले गेले. राऊत यांच्या डोक्यावरून कंटेनरचे चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. ते घटनास्थळीच जागीच ठार झाले. हा भीषण अपघात घडताच कंटेनर चालकाने वाहन घटनास्थळी न थांबविता तसेच राऊत यांची अपघातग्रस्त स्कूटी दुचाकी अपघातग्रस्त कंटेनरला जाम गुंतुन जवळपास तब्बल सात किलोमीटर अंतरापर्यंत निर्दयीपणे फरफटत आणली. मात्र घटनास्थळी असलेल्या काही युवकांनी पाठलाग करत चित्तेपिंपळगाव येथील ग्रामस्थांच्या मदतीने त्या वाहनाचा पाठलाग करून वाहनासह चालकाला चित्तेपिंपळगाव येथे पकडले. या अपघाताची माहिती मिळताच चिकलठाणा पोलिस, चित्तेपिंपळगाव येथे व करमाड पोलिस घटनास्थळी लगेचच दाखल झाले होते. या अपघाताची नोंद करमाड पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास करमाड पोलिस करीत आहेत. मृत नारायण राऊत यांच्या पार्थिवावर सोमवारी सायंकाळी हर्षी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

Aurangabad Accident News
वाईनची दुकाने फोडणार, इम्तियाज जलील यांचे मुख्यमंत्री ठाकरेंना खुले आव्हान

आडूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नेहमी वादग्रस्त

आडूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जेव्हा मृत नारायण राऊत यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामस्थांनी आणले असता तेव्हा या ठिकाणी कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश घुले यांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला. काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर चिघळलेली परिस्थिती लक्षात घेऊन सदरील वैद्यकीय अधिकारी यांनी दुपारच्या सुमारास नारायण राऊत यांचे शवविच्छेदन केले. या भीषण अपघातात ठार झालेले नारायण राऊत हे पैठणचे माजी पंचायत समिती सदस्य बाबा राऊत व हर्षीचे उपसरपंच डॉ गणेश राऊत यांचे चुलत भाऊ होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.