आमदार जैस्वाल यांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब,कामे करण्याचे आदेश

औरंगाबाद - आमदार प्रदीप जैस्वाल यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन जाब विचारला.
औरंगाबाद - आमदार प्रदीप जैस्वाल यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन जाब विचारला.सकाळ
Updated on

औरंगाबाद : गोमटेश मार्केट-दलालवाडी (Aurangabad) येथील नाल्याचे काम सुरु आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर हे काम सुरु केले आहे. काम संथगतीने सुरु असल्याने नाल्यातील कचरा व गाळ साचल्यामुळे पाऊस पडल्यावर दुकानांमध्ये व घरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरत होते. या विषयी नागरिकांनी अनेक तक्रारी करूनही प्रशासन दखल घेत नाही. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी माजी नगसेवक अनिल मकरिये यांच्याकडे ही कैफियत मांडली. त्यानंतर मकरिये यांनी ही बाब आमदार प्रदीप जैस्वाल (MLA Pradip Jaiswal) यांच्याकडे मांडली. शनिवारी (ता.३१) आमदार जैस्वालांनी नाल्याची पाहणी केली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत त्यांना जाब विचारला. येत्या आठ दिवसात नाल्यावरील पुलांचे काम सुरु करा यासह साचलेले कचरा बाहेर काढा अशा सूचनाही श्री.जैस्वाल यांनी केल्या. औषधी भवनजवळील नाल्यावरील पूल बांधण्याचे काम रस्ते विकास महामंडळामार्फत केले जात आहे. त्यासाठी जुना पूल पाडण्यात आला आहे. या नाल्यात अनेक वर्षांपासूनचा गाळ साचला आहे.(pradip jaiswal angry on aurangabad municipal corporation's offficers on work condition glp88)

औरंगाबाद - आमदार प्रदीप जैस्वाल यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन जाब विचारला.
बॉलिवूडलाही पडली औरंगाबादची भुरळ! २० ते ३० दिवसांचे चित्रीकरण

त्यात प्लॅस्टिक कचऱ्याचा देखील समावेश आहे. पुलाचे काम करण्यासाठी नाला स्वच्छ करणे गरजेचे आहे. मात्र नाल्यातील कचरा काढताच इतर भागातील कचरा पावसाच्या पाण्यासोबत वाहून येत या ठिकाणी सातच आहे. त्यामुळे पुलाचे काम कंत्राटदाराने थांबविले आहे. दरम्यान गुलंमडी ते पैठणगेट हा एका बाजूचा रस्ता बंदच आहे. नागरिकांना एकाच बाजूच्या रस्त्याचा वापर करावा लागत आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून औषध भवन गोमटेश मार्केट येथील नाले सफाईचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. पावसामुळे नाल्यातील कचरा घरात आणि दुकानात शिरत आहे. या विषयी व्यापाऱ्यांनी तक्रारी केल्या. मात्र महापालिकेने कुठलीही दखल घेतली नाही. काही व्यापाऱ्यांनी हीच तक्रार श्री. मकरिये यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी महापालिका दखल घेत नसल्याचे आमदार जैस्वाल यांच्या कानावर टाकली. त्यानंतर शनिवारी श्री.जैस्वाल यांनी व्यापारी, मकरिये यांच्यासह नाल्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता संजय काकडे, उपअभियंता नामदेव गाडेकर यांना तेथे बोलावून जाब विचारला व तत्काळ नाले सफाईचे काम सुरु करण्याचे आदेश दिले. नाल्यातील कचरा काढल्यानंतर आठ दिवसांत कामाला सुरुवात करण्याची तयारी कंत्राटदाराने दर्शवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.