'बंब यांनी मुक्तेश्वरकडे हात न पसरता बंद पडलेला गंगापूर कारखाना चालू करावा'

आमदार प्रशांत बंब स्वतःचे राजकीय वजन वापरून तोडचिठ्ठ्या घेत इतर नातेवाईकांचा ऊस तोडणे चालू केल्यामुळे असंख्य शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण तयार झाले आहे.
prashant bamb
prashant bambesakal
Updated on

शेंदूरवादा (जि.औरंगाबाद) : भेंडाळा परिसरात आमदाराच्या मालकीचे ऊसाचे टिपरूही नसतांना त्यांच्या नावे कारखान्यात ऊस गेलाच कसा ? आमदार स्वतःच्या स्वार्थासाठी मुक्तेश्वर साखर कारखान्यात (Mukteshwar Sugar Mill) राजकारण करत आहे. झालेल्या प्रकारच्या चौकशीअंती संबधितावर कारवाई करावी, अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब शेळके, राष्ट्रवादीचे (NCP) युवा नेते संतोष माने यांच्या नेतृत्वखाली शेतकऱ्यांच्या वतीने गुरूवारी (ता.२७) मुक्तेश्वर येथे प्रशासनाला करण्यात आली. नोंदणी क्रमवारपणे तोडचिठ्ठी देण्याचे फर्मान असतांना मध्येच तालुक्याचे विद्यमान आमदाराच्या स्वतःचे राजकीय वजन वापरून तोडचिठ्ठ्या घेत इतर नातेवाईकांचा ऊस तोडने चालू केल्यामुळे असंख्य शेतकऱ्यात संतापाचे वातावरण तयार झाले. परिणामी अनेकांनी प्रहार संघटनेचे (Prahar Shetkari Sanghatna) भाऊसाहेब शेळके यांच्याकडे तक्रारी केल्या. त्या तक्रारीची दखल घेऊन प्रहारचे भाऊसाहेब शेळके व संतोष माने यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ऊस उत्पादक शेतकरी मुक्तेश्वर साखर कारखान्यावर दाखल होऊन आमदार यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी केलेल्या कृत्याबद्दल विचारणा केली. (Prashant Bamb Should Not Interfere In Mukteshwar Sugar Mill, Reopen Gangapur Sugar Mill Aurangabad News)

prashant bamb
एसआरपीएफ जवानाची गळफास घेऊन आत्महत्या,सुट्टीवर असताना उचलले टोकाचे पाऊल

यावेळी वाळूज पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विनायक शेळके यांनी गेटवरच संतोष माने, भाऊसाहेब शेळके यांना कलम १४९ नुसार एक नोटीस देत समन्वयाच्या भूमिकेतून पोलिसांनी शेतकरी व ज्येष्ठ संचालक रामचंद्रअण्णा निरपळ, शेतकी अधिकारी नंदकुमार कुंजर यांनी सविस्तर चर्चा करून नोंदणी झालेला ऊस तोडण्यात येईल. निरपळ म्हणाले, की कारखान्याची एकूण हंगामात क्षमता केवळ साडेचार लाख टनापर्यत जाऊ शकते. तालुक्यात १० ते ११ लाख टन ऊस असून दोन ते अडीच लाख टन अतिरिक्त ऊसाचा प्रश्न आहे. कारखान्यात कोणतेही राजकारण न करता, वेळेवर पैसे देणे प्रमाणिक वजन काटा या शेतकऱ्याचीच बाजू आम्ही सांभाळीत आहोत. संतोष माने म्हणाले की, भेंडळा येथील शेतकऱ्यांचा ऊस हा आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांच्या नावे न टाकता तो शेतकऱ्यांच्याच नावे टाकण्यात यावा. आमदार खरे तर गंगापूर कारखान्याचे चेअरमन आहेत.(Aurangabad Update)

prashant bamb
लाय-डिटेक्टर असते तर... कन्हैय्या कुमार यांची नरेंद्र मोदींवर टीका

त्यांनी मुक्तेश्वरकडे हात न पसरता बंद पडलेला गंगापूर साखर कारखाना चालू करावा. तर भाऊसाहेब शेळके म्हणाले की, आज मुक्तेश्वर साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात लाखो टन ऊस ऊभा आहे. त्यासाठी कारखान्याची गाळप क्षमता वाढविणे आवश्यक असून आम्ही सर्वतोपरी मदत करायला तयार आहे. यावेळी शेतकऱ्यांसह पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण उबंरे, विनायक शेळके, सय्यद हानिफ ,ठाणे अंमलदार अभिमन्यु सानप, प्रदीप बोरूडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.