Sambhaji Nagar News : गोरगरिबांचे घराचे स्वप्न साकार ; रमाई आवाससाठी शासनाकडून १११ कोटींची तरतूद

पंतप्रधान आवास योजनेचे काम शहरात रखडले असले तरी अनुसूचित जाती व नवबौद्धांसाठी असलेल्या रमाई आवास योजनेअंतर्गत चार हजार ८६६ घरांची कामे सुरू आहेत. यातील तीन हजार २५३ घरांची कामे पूर्ण झाली असून लाभार्थ्यांना १०६.३१ कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे.
sambhaji nagar
sambhaji nagar sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान आवास योजनेचे काम शहरात रखडले असले तरी अनुसूचित जाती व नवबौद्धांसाठी असलेल्या रमाई आवास योजनेअंतर्गत चार हजार ८६६ घरांची कामे सुरू आहेत. यातील तीन हजार २५३ घरांची कामे पूर्ण झाली असून लाभार्थ्यांना १०६.३१ कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे. या योजनेत सुमारे पाच हजार घरे बांधण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी १११.३२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

शहरातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी रमाई आवास योजना राबवली जात आहे. त्यात ३० चौरस मीटर क्षेत्रावर बांधकाम करण्यासाठी शासनाकडून अनुदान मिळते. सुमारे अडीच लाख रुपये तीन टप्प्यात दिले जातात. या योजनेअंतर्गत पाच हजार घरे बांधण्याचे उद्दिष्ट महापालिकेला देण्यात आले आहे. यातील चार हजार ८६६ घरांची बांधकामे मंजूर करून कामे सुरू करण्यात आली आहेत तर तीन हजार २५३ घरांची बांधकामे पूर्ण झाली आहेत. या लाभार्थ्यांना १०६ कोटी ३१ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. सध्या एक हजार ६१३ घरांची कामे सुरू आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

sambhaji nagar
Sambhaji Nagar News : मराठवाड्यात मतदार दीड कोटीवर ; तयारी लोकसभा निवडणुकीची, एक लाखाने वाढली संख्या

३५ कोटींच्या निधीची गरज

सध्या मंजूर असलेल्या घरांचा विचार करता महापालिकेला ४०.३२ कोटींचा निधीची गरज आहे. दरम्यान आत्तापर्यंत मंजूर करण्यात आलेल्या १११ कोटी ३२ लाख रुपयांच्या निधीपैकी १०६ कोटी ३१ लाखांचा निधी खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या पाच कोटी एक लाखाचा निधी शिल्लक आहे. म्हणजेच ३५ कोटी ३१ लाख रुपयांच्या निधीची गरज आहे, असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.