औरंगाबाद : जिल्हा दूध संघ सर्वपक्षीय एकता पॅनलने ताब्यात घेतला. आता अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अध्यक्षपदासाठी आमदार हरिभाऊ बागडे (Haribhau Bagade) यांच्या नावाला सर्वांची संमती असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, उपाध्यक्षपदासाठी शिवसेना-भाजपत रस्सीखेच दिसून येत आहे. शनिवारी (ता.पाच) अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठीची निवड होणार आहे. या संदर्भात चारही पक्षांची बैठकीनंतर निर्णय होणार असल्याचे राजकीय पक्षातर्फे सांगण्यात आले. जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदापेक्षा (Aurangabad) उपाध्यक्षाच्या पदाला महत्त्व सध्या दिसून येत आहे. उपाध्यक्षपद मिळावे यासाठी शिवसेना (Shiv Sena), भाजप (BJP), राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसचेही (Congress Party) प्रयत्न सुरू आहे. या संदर्भात फिल्डिंगही लावण्यात येत आहे. (Race For Vice President Of Aurangabad District Milk Producing Federation)
यामुळे गेल्या वेळी शिवसेनेकडे असलेले हे उपाध्यक्षपद टिकविण्यासाठी शिवसेनेतर्फे जोरदार प्रयत्न केले जात आहेत. यात स्वत: कॅबिनेटमंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) लक्ष घालत आहेत. त्यांचे निकटवर्तीय नंदलाल काळे यांच्याकडे उपाध्यक्षपद होते. मात्र यावेळी नवीन चेहरा असेल, असे काही संचालकांनी सांगितले. यामुळे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्ष तयारीत आहेत. (Aurangabad District Milk Producing Election 2022)
महिलांना संधी मिळेल का?
राजकारणात ५० टक्के आरक्षण मिळाले आहे. असे असले तरी महिला त्या पदावर केवळ नामधारी असतात. जिल्हा दूध संघातही महिलांच्या दोन जागा आहेत.आतापर्यंत महिलांना अध्यक्ष अथवा उपाध्यक्षपद मिळालेले नाही. किमान या निवडणुकीत तरी महिलांना अध्यक्ष किंवा उपाध्यक्षपद मिळेल का, की नुसते औपचारिकता पूर्ण केली जाईल. याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.
या संदर्भात चारही पक्षांतील प्रमुखांची बैठकी झाल्यानंतरच निर्णय होणार आहे. या संदर्भात उद्या किंवा निवडीच्या दिवशी चारही पक्षांतील प्रमुख बैठक होणार आहेत. त्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड होईल.
- डॉ. कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष, तथा माजी आमदार
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.