औरंगाबादला सक्षम करणारे औद्योगिक नेतृत्व हरपले

सत्तरच्या दशकात भारतात औद्योगिकीकरण मूळ धरत होते. त्याच काळात राहुल बजाज यांच्या रूपाने भारताला एक ‘स्पष्ट विचार - ठाम-कणखर नेतृत्व’ असलेले औद्योगिक नेतृत्व लाभले.
Rahul Bajaj
Rahul BajajSakal
Updated on
Summary

सत्तरच्या दशकात भारतात औद्योगिकीकरण मूळ धरत होते. त्याच काळात राहुल बजाज यांच्या रूपाने भारताला एक ‘स्पष्ट विचार - ठाम-कणखर नेतृत्व’ असलेले औद्योगिक नेतृत्व लाभले.

औरंगाबाद - सत्तरच्या दशकात भारतात औद्योगिकीकरण (Industrialization) मूळ धरत होते. त्याच काळात राहुल बजाज (Rahul Bajaj) यांच्या रूपाने भारताला एक ‘स्पष्ट विचार - ठाम-कणखर नेतृत्व’ असलेले औद्योगिक नेतृत्व लाभले व कठीण काळातून मार्गक्रमण करताना भारताला (India) उपयोग झाला, अशा शब्दांत औरंगाबादेतील सीएमआयए, सीआयआय, मसिआ, औरंगाबाद फर्स्टच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. उद्योजक संघटनातर्फे राहुल बजाज यांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला.

‘बुलंद भारत की बुलंद तस्वीर’

ऐंशीच्या दशकात परमीटराज, कच्च्या मालाची कमतरता, तंत्रज्ञाचा अभाव अशा परिस्थितीत राहुल बजाजांच्या नेतृत्वात या भारतीय उद्योगाने स्कुटर व रिक्षा उद्योगात उभारी घेत सामान्यांना परवडतील अशी वाहने घराघरात पोचली व ‘हमारा बजाज’ हे स्थान निर्माण केले. नव्वदच्या दशकात खुल्या अर्थव्यवस्थेचे वारे वाहायला लागले व त्या सुमारास बजाज उद्योग समूहाने वेगाने प्रगती केली व ‘बुलंद भारत की बुलंद तस्वीर’ हे स्थान निर्माण केले.

औरंगाबादचे नशीब व भविष्य उज्ज्वल करणारा उद्योग चिकलठाणा औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून औरंगाबादच्या औद्योगिक विकासाला सुरुवात झाली होती; पण दुर्दैवाने विविध कारणांमुळे हे औद्योगिकीकरण मूळ धरू शकले नाही व आजारी औद्योगिक वसाहत असे चित्र निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर १९८३ च्या सुमारास तत्कालीन राजकीय नेतृत्व व राहुल बजाज यांनी वाळूज औद्योगिक वसाहतीत उद्योग स्थापनेचा निर्णय हा औरंगाबादचे भविष्य उज्ज्वल करणारा ठरला.

बजाज उद्योगाने घडवलेल्या औद्योगिक पायामुळे पुढे औरंगाबादने प्रगतीचा आलेख चढताच ठेवला. मराठवाड्याच्या हातांना काम मिळाले, महाराष्ट्रातून काम करण्यासाठी औरंगाबादला ‘ह्युमन टॅलेंट’ यायला सुरुवात झाली व पाहता पाहता औरंगाबादला अशियातील सर्वांत वेगाने वाढणारे शहर ही उपाधी लाभली. याचे फार मोठे श्रेय राहुल बजाज यांना जाते.

Rahul Bajaj
कोरोनातून बऱ्या झालेल्या सुनेला सासऱ्याने दिले किडनीदान

मार्गदर्शकाची भूमिका

९० च्या दशकात वाळूजला व २००० च्या सुमारास शेंद्र्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उद्योग येण्यास सुरुवात झाली. प्रत्येक मोठा उद्योग हा निर्णय घेण्यापूर्वी बजाज ऑटो कशी मोठी झाली याचा अभ्यास करायचा व बजाज समूहाचे मार्गदर्शन घ्यायचा. याचा परिपाक म्हणून औरंगाबाद हे महाराष्ट्रातील पहिल्या पाच औद्योगिक शहरांपैकी एक आहे. १९९५ नंतर बजाज समूहाने कामे व्हेंडरकडून करून घेण्याचा निर्णय घेतला. विशेष बाब म्हणजे व्हेंडरने आपला प्लॅंट औरंगाबादला टाकावा ही अपेक्षा व्यक्त केली. यातून औरंगाबादला केवळ उद्योग व रोजगारच नाही तर उद्योजकही मिळाले. आज शहरात अनेक पहिल्या पिढीचे उद्योग आपली नाळ बजाजशी जोडलेली आहे व आम्हाला उद्योजक म्हणून घडवण्यात बजाज यांचा मोठा वाटा आहे.

सामाजिक बांधिलकीची जाणीव

राहुल बजाज यांची सामाजिक बांधिलकीची जाणीव अतिशय सखोल होती. केवळ सीएसआर निधीचे वाटप हे त्यांच्या व्यावसायिक मूल्य प्रणालीला मान्य नव्हते. ते कृतिशील नेतृत्वावर विश्वास ठेवणारे होते. म्हणून त्यांनी जानकीदेवी बजाज ट्रस्ट व (BYST) च्या माध्यमातून औरंगाबाद व परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ‘पाणी, उद्योजकता, शिक्षण व आरोग्य’ या अत्यंत गरजेच्या बाबींवर मोलाचे व अत्यंत प्रभावी काम केले.

औद्योगिक डीएनएची पाळेमुळे रुजवली

औरंगाबादसाठी ‘ओन्ली ॲग्रिकल्चर ते औद्योगिक कल्चर’ या प्रवासात राहुल बजाज यांचे योगदान अमूल्य आहे. केवळ अजिंठा वेरूळ ही ओळख असलेले औरंगाबाद हे आज भारतातील सर्वांत जास्त निर्यात करणाऱ्या शहरात २७ व्या स्थानी आले आहे. यात बजाज ऑटो व त्यांनी ‘वेळ-दर्जा-किंमत’ याला महत्त्व देऊन काम करावे या औद्योगिक डीएनएची पाळेमुळे रुजवली. त्यांनी मार्गदर्शन केलेल्या औद्योगिक मूल्यावर वाटचाल करून औरंगाबादने भारतातील प्रथम १० शहरांतील एक हे बिरूद मिळवणे ही खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत उद्योजक संघटनांनी आदरांजली वाहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.