छत्रपती संभाजीनगर - दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागामध्ये असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आठ प्रमुख रेल्वे स्टेशनकडून रेल्वेला १०० कोटी ६ लाख ९५ हजार रुपयांचा महसूल मिळाला. यात सर्वाधिक म्हणजे ९९ कोटी ३ लाख ८८ हजार ६१ रुपयांचा महसूल छत्रपती संभाजीनगर, चिकलठाणा आणि मुकुंदवाडी या शहरातील स्थानकांनी दिला.
जानेवारी ते डिसेंबर २०२३ या वर्षभरात नांदेड विभागांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रेल्वेस्थनाकांकडून मोठ्या प्रमाणात महसूल मिळाला. छत्रपती संभाजीनगर स्टेशनमधून ९७ कोटी ४७ लाख २६ हजार १५१ रुपयांचा महसूल मिळाला आहे तर या स्थानकावर ५० लाख ८६ हजार ६७५ प्रवासी उतरले तर ५५ लाख ८८ हजार ७७४ प्रवासी इथून गेले. चिकलठाणा स्थानकातून रेल्वेला ३ लाख ९३ हजार ५१५ कोटी रुपयांचा महसूल मिळाला.
७ हजार २६८ प्रवासी आले तर ३ हजार ५२१ प्रवासी गेले आहेत. मुकुंदवाडी स्थानकावरून ३ लाख ९ हजार १७३ प्रवासी आले तर १ लाख १२ हजार २७६ प्रवासी गेले. या स्थानकातून १ कोटी ५२ लाख ६८ हजार ३९५ रुपयांचा महसूल रेल्वेला मिळाला.
दौलताबाद स्थानकातून ३ लाख ५१ हजार २५ रुपयांचा महसूल मिळाला. १७ हजार ४४६ प्रवासी उतरले तर ९ हजार ९२१ प्रवासी स्थानकावरून गेले. करमाड स्थानकातून ९ लाख २ हजार ८१० रुपयांचा महसूल दिला आहे तर या ठिकाणी १७ हजार ५२१ प्रवासी उतरले तर ११ हजार ९८९ प्रवासी गेले. लासूर स्टेशनातून ३ लाख १५ हजार ८५७ प्रवासी आले तर या स्टेशनवर २ लाख ४१ हजार ५५७ प्रवासी गेले.
या स्टेशनवरुन रेल्वेला १ कोटी ३ लाख ६ हजार ९४२ रुपयांचा महसूल मिळाला. पोटूळ स्थानकावर ९ हजार ४४४ प्रवासी आले तर २ हजार ३०५ प्रवासी इथून गेले. या स्थानकातून २ लाख ५५ हजार ३६० रुपयांचा रेल्वेला महसूल मिळाला. परसोडा स्थानकात ३६ हजार २४ प्रवासी आले तर १० हजार ५७२ प्रवासी या स्थानकावरून गेले. या स्थानकाने रेल्वेला ७ लाख ९५ हजार ९२० रुपयांचा महसूल दिला.
लांब पल्ल्याच्या ट्रेन सुरू कराव्यात
मराठवाडा रेल्वे कृती समितीचे रेल्वेचे अभ्यासक स्वानंद सोळंके म्हणाले, छत्रपती संभाजीनगर इथून रेल्वेंची संख्या कमी असतानासुद्धा १०० कोटींपेक्षा जास्त महसूल रेल्वेला मिळवून दिला. यामुळे छत्रपती संभाजीनगर, चिकलठाणा, मुकुंदवाडी या शहरातील रेल्वेस्थानकांची उत्पन्न मिळवून देण्याची क्षमता पाहता रेल्वे प्रशासनाने पिटलाइनचे काम लवकर पूर्ण करून इथून लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू कराव्यात. यामुळे प्रवाशांची सोय होईल आणि रेल्वे प्रशासनाच्या उत्पन्नातही वाढ होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.