औरंगाबाद : राज ठाकरेंनी मागितली माफी!

दौरा राजकीय नव्हे, संघटना बांधणीसाठी : ठाकरे
औरंगाबाद : राज ठाकरेंनी मागितली माफी!
औरंगाबाद : राज ठाकरेंनी मागितली माफी!sakal
Updated on

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे तब्बल २१ महिन्यांनी सोमवारी (ता. १३) रात्री औरंगाबादेत आगमन झाले. महावीर चौकात त्यांचे ढोल, ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. त्यानंतर ते मनसैनिकांच्या दुचाकी रॅलीसोबतच सुभेदारी विश्रामगृहाकडे मार्गस्थ झाले. मात्र, वाहनातून उतरून मनसैनिकांचे स्वागत स्वीकारू नाही शकले, याबद्दल राज ठाकरे यांनी सुभेदारी येथे पोचल्यावर कार्यकर्त्यांची माफी मागितली. तसेच हा दौरा राजकीय नसून संघटना बांधणीसाठी असल्याचेही स्पष्ट केले.

नाशिक येथील पक्षाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर राज ठाकरे हे रस्ता मार्गाने औरंगाबादला आले. औरंगाबादेत ते सायंकाळी पाच वाजताच येणार होते. मात्र, नियोजित वेळेपेक्षा त्यांना यायला तब्बल अडीच तास उशीर झाला. महावीर चौकात शेकडो मनसैनिक स्वागतासाठी उभे होते. याचवेळी राज ठाकरे वाहनातून उतरले नव्हते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सुभेदारीवर गर्दी केली. हे राज ठाकरे यांना समजल्यावर, कार्यकर्त्यांना भेटायला तेथील सभागृहात ते लंगडतच आले.

औरंगाबाद : राज ठाकरेंनी मागितली माफी!
रेल्वे तिकीट काळा बाजार; ट्रॅव्हल संचालकासह एजंट अटकेत

कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राज ठाकरे म्हणाले, की काही महिन्यांपूर्वी माझा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्याचे काही दिवसांपुर्वीच ऑपरेशन झाले. डॉक्टरांनी आणखी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे वैजापुर, गंगापूर आणि औरंगाबादेतही वाहनातून खाली उतरून सत्कार स्विकारता आला नाही. त्याबद्दल मी माफी मागतो. तसेच उद्याचा कार्यक्रम राजकीय नसून संघटनेचा आहे. कार्यकर्त्यांनीही संघटना बांधणीकडे लक्ष द्यावे.’ याचवेळी एकजण मोबाईलवर शुटींग करत होता, त्याचे निमित्त करून त्यांनी ‘मोबाईलवर चित्रण करण्यापेक्षा स्वत:च्या डोळ्याने बघायला सुरवात करा आणि मोबाईल खिशात ठेवा, गप्पा करा, बोललात तर तुमचे प्रश्‍न कळतील,’ असा सल्ला दिला.

सुभेदारी विश्रामगृहात ते मुक्कामी थांबले आहेत. सप्तपदी मंगल कार्यालयात मंगळवारी (ता. १४) सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेदरम्यान, कार्यकर्ता मेळावा होणार आहे. मराठवाड्यातील कार्यकर्त्यांच्या दिवसभर तालुकानिहाय बैठका होणार आहेत. सुरवातीला राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर दुपारी दोन वाजता ते सुभेदारी विश्रामगृह येथे ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.

औरंगाबाद : राज ठाकरेंनी मागितली माफी!
अकोला : अकोल्याच्या धुळीवर आता ​यंत्राची मात्रा!

महावीर चौकात वाहतूक कोंडी

महावीर चौकात सायंकाळपासून मनसैनिकांनी गर्दी केली होती. ढोल, ताशे आणि दुचाकी रॅली काढण्यात येत होती. त्याचवेळी वाहतूक सिग्नलही बंद असल्याने वाळूज औद्योगिक वसाहतीकडून येणाऱ्या कामगार वर्गाची मात्र मोठी कोंडी झाली. यामुळे पोलिसांवर मोठा ताण आला.

एकाला मनसैनिकांनी चोपले

महावीर चौकात सायंकाळी राज ठाकरे येण्यापूर्वी त्याच गर्दीत एका जणाने महिला पदाधिकाऱ्याची छेड काढल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. यावेळी मनसैनिकांनी मोठा राडा करत त्या तरुणाला चोपले. याप्रकरणी पोलिसात मात्र, दोन्ही बाजूंनी तक्रार देण्यात आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.