औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. याच दरम्यान मोठी कारवाई झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार औरंगाबाद मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. यामुळे दाशरथे यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरल्याची समजते. सुहास दाशरथे हे अगोदर शिवसेनेत होते. त्यांना महत्त्वाचे पद न मिळाल्याने त्यांनी मनसेत प्रवेश केला होता. येथेही त्यांची उपेक्षाच झाली. मनसेतील गटबाजीमुळे काही दिवसांपासून औरंगाबादेत (Aurangabad) वाद पाहायला मिळत होता. आज मंगळवारी (ता.१४) राज ठाकरे शहरात मराठवाड्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. (Raj Thackeray's Aurangabad Tour, Removed Suhas Dashrathe From MNS District Chief)
आगामी औरंगाबाद महानगरपालिका, नगरपंचायत निवडणुकींच्या तयारीच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. सोमवारी (ता.१३) रात्री त्यांचे शहरात आगमन झाले. पदाधिकारी, कार्यकर्त्यांना त्यांचे स्वागत करता आले नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनी त्यांची माफी मागितली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.