औरंगाबाद : बेशिस्त वाहतुकीला राँगसाईडचाही ताप!

राँगसाईड वाहनधारकांचा वाढला वावर
औरंगाबाद : बेशिस्त वाहतुकीला राँगसाईडचाही ताप!
औरंगाबाद : बेशिस्त वाहतुकीला राँगसाईडचाही ताप!sakal
Updated on

औरंगाबाद : शहरात राँगसाईडची संस्कृती वाढत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. जालना रस्त्यावर वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी वाहतूक शाखेने आकाशवाणी आणि अमरप्रित सिग्नल बंद केल्याने वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली. मात्र, दुसरीकडे रॉंग वाहनांचा ताप वाढला आहे. कमी अधिक प्रमाणात सर्वच रस्त्यांवर रॉंगसाईड वाहन चालवणाऱ्यांची संख्या वाढल्याने व्यापक कारवाईची गरज निर्माण झाली आहे.

शहरात वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखा प्रचंड मेहनत घेत आहे. वारंवार वाहतूक व्यवस्थेत नवनविन बदल करत आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मदत होत असतानाच वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जालना रोडवर सातत्याने वाहतूक कोंडीचा अनुभव येत होता, त्यामुळेच वाहतूक पोलिसांनी आकाशवाणी आणि अमरप्रित हे दोन सिग्नल बंद करुन वाहतूक सरळ सुरु ठेवण्याचा प्रयोग केला.

औरंगाबाद : बेशिस्त वाहतुकीला राँगसाईडचाही ताप!
कारंजा : लसीकरण करा, अन्यथा कारवाई; तहसीलदार मांजरे

या प्रयोगाने वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली आहे. मात्र यामुळे वाहनधारकांना दुरवरुन वळून यावे लागत आहे. त्यामुळेच वाहनधारक सरळ रॉंगसाईड वाहने चालवत आहेत. विशेष म्हणजे वाहनधारक रॉंगसाईड वाहन चालवणाऱ्याला आपण रॉंगासाईड जात आहोत, किमान वाहन हळू चालवावे याचेही भान नसते. आपल्या सरळ जाणाऱ्या मार्गात केंव्हा रॉंगसाईड वाहन अंगावर येईल याचा नेम राहिला नाही, त्यामुळे वाहनधारकांमध्ये रॉंगसाईड वाहने चालवणाऱ्यांची दहशत निर्माण झाली आहे.

अशी आहे काहीशी परिस्थिती

  • जालना रस्त्यावर क्रांतीचौक ते सिडको चौक आणि सिडको चौक ते क्रांतीचौक अशा दोन्ही मार्गावर सर्रास वाहने रॉंगसाईड.

  • समतानगर कडून आल्यानंतर क्रांतीचौकाकडे जाताना सर्रास वाहने रॉंगसाईड चालवले जात आहेत.

  • अदालत रोडवर म्हणजे न्यायालयाच्या सिग्नलपासून क्रांतीचौकाच्या दिशेने सर्रास वाहने रॉंगसाईड चालवली जात आहेत.

  • टीव्ही सेंटर चौकातून एन-१२ च्या दिशेने जाताना सलिम अली सरोवराच्या रस्त्यावर वाहने रॉंगसाईड चालवली जातात.

  • काला दरवाजाकडून येणारे वाहनधारक जिल्हाधिकारी यांच्या निवासापर्यंत रॉंगसाईडचा आधार घेतात.

  • जळगाव रस्त्यावर बजरंग चौकाकडून नारेगावकडे जाणारे वाहनधारक देवगिरी बॅंकेच्या चौकातून वोखार्ड चौकापर्यत रॉंगसाईड.

  • कॅनॉट प्लेसमधून जालना रस्त्यावर रामगिरी चौकातून आलेले नागरीक हायकोर्ट चौकापर्यंत रॉंगसाईडचा आधार घेतात.

  • गणेश कॉलनीतील शासकीय क्वार्टर परिसरातून आलेले वाहनधारक गुलशन महल पर्यत सर्रास उलट्या दिशेने येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.