भाजप वेगळा डाव टाकणार, दानवेंनीच उघडले पत्ते

Raosaheb Danave
Raosaheb DanaveRavsaheb Danave
Updated on

बुद्धिबळाचे बादशहा देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला हरवले आहे. आता विधान परिषदेच्या निवडणुकीत आम्ही तोच खेळ खेळणार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला आमचा तो मार्ग माहीत झाला आहे, त्यामुळे ते आता त्या रस्त्याने जाणार आहेत. (Raosaheb Danve Latest News)

आम्ही आता वेगळा डाव टाकणार आहोत. भाजपचे सर्व पाचही उमेदवार निवडून आणणार आहोत, असा गौप्यस्फोट केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. (MLC Election 2022)

माध्यमांशी संवाद साधताना दानवेंनी या गोष्टींचा उलगडा केला. ते म्हणाले, विधान परिषदेच्या निवडणुकीत आम्ही वेगळ्या मार्गाने जाणार असून आमचे सर्व उमेदवार निवडून आणत महाविकास आघाडीला आणखी एक धक्का देणार आहोत. एकनाथ खडसे यांना पराभूत करण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे, असा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. त्यावर दानवे म्हणाले, आम्ही खडसे यांनाच नाही तर काँग्रेस, राष्ट्रवादी

आणि शिवसेनेला हरवणार आहेात. आम्ही कोणत्याही व्यक्तीला हरवण्यासाठी निवडणूक लढवत नाही. खडसेंना उमेदवारी दिली नसती तर भाजपने ही निवडणूक बिनविरोध केली असती, असेही जलील यांनी म्हटले आहे. त्यावर दानवे म्हणाले, आमचा असा कोणताही प्रस्ताव महाविकास आघाडीकडे गेलेला नाही. कारण, देवेंद्र फडणवीस आणि मी बुधवारी (ता. १५ जून) जालन्यात एकत्र होतो. आमची या विषयावर चर्चाही झाली. खडसेंना उमेदवारी देऊ नका, असा कोणताही प्रस्ताव आम्ही दिलेला नाही. त्यांच्या पक्षाचा तो विषय आहे, आम्ही कोणाचे नाव का बरे सुचवावे?

जलील यांचा पंकजा मुंडे यांना सल्ला अन्...

इम्तियाज जलील यांनी पंकजा मुंडे यांना नवीन पक्ष काढण्याबाबत दिलेल्या सल्ल्यावरही दानवे यांनी स्पष्ट मत व्यक्त केले. ते म्हणाले की, राजकारणात दुसऱ्यांमध्ये कसा खोडा घालता येईल, असे प्रत्येकजण पाहत असतो. जलील म्हटल्यावर पंकजा मुंडे त्यांना प्रतिसाद देतील, असे काही नाही. त्या पक्षाच्या प्रमुख नेत्या आहेत. गोपीनाथ मुंडे हे भाजपचे संस्थापक सदस्य होते. त्यामुळे असे कोणाच्याही बोलण्यावर त्या निर्णय घेतील, असे वाटत नाही. पंकजा मुंडे राष्ट्रीय चिटणीस आहेत. पक्ष योग्य त्या ठिकाणी त्यांचा विचार करेल, अशी खात्री आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()