Dhananjay Munde: धनंजय मुंडेंचे वागणे शोभते का? सांस्कृतिक कार्यक्रम अन् अतिवृष्टीवरुन संभाजीराजेंचा सवाल

Sambhaji Raje: स्वराज्य पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शासनाची मदत मिळेपर्यंत वाट पाहणार नाही. दहा दिवसांत पक्षाकडून मदत देणार, जीवन संपवण्याचा विचार मनात आणू नका.
Dhananjay Munde Sambhajiraje
Dhananjay Munde SambhajirajeEsakal
Updated on

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या वेदना ऐकून दुःख होत आहे. पण कृषिमंत्री धनंजय मुंडे पीक नुकसानीची पाहणी करण्याऐवजी सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न आहेत. हे महाराष्ट्राला शोभते का, असा प्रश्न स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केला.

तालुक्यातील उंचडा, मार्लेगाव आणि धानोरा या गावांना भेट देऊन पीक नुकसानीची पाहणी केली. ते म्हणाले, "शेतकऱ्यांचे संभाजीराजे यांनी आज हदगाव नुकसान पाहून अत्यंत दुःखी झालो आहे. एवढे नुकसान झाले आहे, तरीही आमदार, खासदार तर सोडाच कृषिमंत्रीही पाहणीला आले नाहीत. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ते व्यस्त आहेत."

Dhananjay Munde Sambhajiraje
Nagpur Hit And Run Video: "त्या मुलाला वाचवण्यासाठी..." नागपूर ऑडी अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

जीवन संपण्याचा विचार करू नका

'मदत न मिळाल्यास जीवन संपवण्याशिवाय मला पर्याय नाही' असे चव्हाण नावाच्या एका शेतकऱ्याने संभाजीराजे छत्रपती यांना सांगितले. त्यावर, 'स्वराज्य पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शासनाची मदत मिळेपर्यंत वाट पाहणार नाही. दहा दिवसांत पक्षाकडून मदत देणार, जीवन संपवण्याचा विचार मनात आणू नका' असे आश्वासन संभाजीराजे यांनी दिले.

Dhananjay Munde Sambhajiraje
Chandrashekhar Bawankule: "ती गाडी माझ्या मुलाच्या नावे," नागपूर हिट अँड रन प्रकरणी काय म्हणाले बावनकुळे? पाहा व्हिडिओ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()