औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) ‘पेट’चा दुसरा टप्पा घोषित केला आहे. पेटमध्ये (Ph.D. Entrance test) पात्र तसेच पेटमधून सूट मिळालेल्या विद्यार्थ्यांची सात ते ३० जून दरम्यान ऑनलाइन नोंदणी करण्यात येणार आहे, अशी माहिती उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी दिली.
विद्यापीठातर्फे ‘पीएच.डी‘ एंट्रन्स टेस्ट (पेट पेपर पहिला व दुसरा) जानेवारी व मार्च महिन्यात घेण्यात आला. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली ४५ विषयात ‘पेट’ घेण्यात आली. पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षेत ४ हजार २९९ पात्र ठरले आहेत. पेट उत्तीर्ण तसेच संशोधनासाठी पात्र (सेट, नेट, एम.फिल आदी) विद्यार्थ्यांची नोंदणी ७ ते ३० जून दरम्यान ऑनलाईन नोंदणी करण्यात येईल. तर ५ जूलैपर्यंत विद्यापीठात ‘हार्ड कॉपी’ जमा करता येईल. या टप्प्यात पेट उत्तीर्ण झालेले तसेच पेटमधून सुट मिळालेले दुसऱ्या टप्प्यात नोंदणी करण्यासाठी पात्र असणार आहेत. यामध्ये नेट, सेट, स्लेट, सीएसआयआर, जेआरएफ, गेट, जीपॅट, एफआयपी तसेच सीईटीमार्फत प्रवेश घेऊन पदवी प्राप्त एम.फिल विद्याथ्र्यांना प्रवेश घेता येईल.
पीएचडीसाठी रिक्त असलेल्या जागा व संशोधक मार्गदर्शकांची यादी संकेतस्थळावर घोषित करण्यात आली आहे. प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. भालचंद्र वायकर, डॉ. धनश्री महाजन आणि परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांच्या उपस्थितीत कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
पुढील महिन्यात आरआरसी
पुढील महिन्यात संशोधन मान्यता समितीच्या (आरआरसी) बैठका घेण्यात येणार आहेत. अधिक माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे परीक्षा विभागाचे उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी कळविले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.