छत्रपती संभाजीनगर : एकीकडे बेरोजगारांची संख्या वाढत असून, एक-दोन जागांसाठी जाहिरात निघताच हजारोंच्या संख्येने बेरोजगार अर्ज करीत असल्याचे चित्र आहे. असे असतानाच दुसरीकडे काही तरुण महापालिकेची कायम नोकरी अवघ्या काही दिवसांतच सोडत असल्याचे चित्र आहे. .महापालिकेत नुकतीच नोकर भरती करण्यात आली. त्यात ८५ जणांना नियुक्तीपत्र देण्यात आले होते. पण, यातील आठ जणांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्याचे कारण देत नोकरी सोडली आहे.महापालिकेतील नोकर भरतीचा विषय अनेक वर्षांपासून गाजत आहे. राज्य शासनाने नव्याने मंजूर केलेल्या आकृतिबंधानुसार महापालिकेत हजारो पदांच्या जागा रिक्त आहेत. मात्र, ही पदे भरताना आस्थापना खर्च ३५ टक्क्यांपेक्षा जास्त नको, अशी अट असल्याने पदभरती करताना विशेष बाब म्हणून महापालिकेला राज्य शासनाची मंजुरी घ्यावी लागते..गरजेनुसार पदांची भरती करण्यास शासनाने महापालिकेला परवानगी दिली आहे. त्यानुसार महापालिकेने सहा महिन्यांपूर्वी नोकर भरती प्रक्रिया राबविली. शासन नियुक्त खासगी कंपनीमार्फत ही प्रक्रिया राबविण्यात आली. कंपनीने महापालिकेला दिलेल्या गुणवत्ता यादीनुसार ८५ जणांना महापालिकेने नियुक्तीपत्र दिले. त्यातील ७१ जण आतापर्यंत रुजू झाले, मात्र यातील कनिष्ठ अभियंतापदावरील तीन, स्थापत्य अभियांत्रिकी-३, तर लेखा लिपिक म्हणून रुजू झालेल्या दोन जणांनी राजीनामे दिले आहेत. एवढेच नाही तर आणखी आठ ते दहा जण राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.पुन्हा राबवावी लागणार भरतीराजीनामा दिलेल्या तरुणांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्याचे कारण समोर केले आहे. असाच प्रकार अग्निशमन विभागात असून, अनेक कर्मचारी अद्याप रुजू झालेले नाहीत. त्यामुळे पुन्हा या पदांसाठी भरती प्रक्रिया महापालिकेला राबवावी लागणार आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.